सिडकोत वृद्धाचा खून, रोकडही लुटली
सिडको : प्रतिनिधी
अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉईंट येथे एका ६५ वर्षीय वृद्धाचा खून झाल्याची घटना घडली आहे. बच्चू सदाशिव कर्डिले असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कर्डिले यांच्या घरातील इतर सदस्य बाहेर गेले होते. जगन्नाथ कर्डिले हे घरात एकटेच असताना अज्ञाताने त्यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने मारले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात मारेकऱ्यांनी कर्डिले यांच्या घरातील सुमारे सहा ते सात लाखांची रोकड लंपास केल्याचे समजते,