नाशिक : प्रतिनिधी
61 व्या राज्य नाट्य स्पर्धेत काल (दि 25 )रोजी पाकिस्तानचे यान हे नाटक सादर करण्यात आले. नाटकाचा बाज हा ग्रामीण होता. नाटकातून ग्रामीण जीवनशैलीचे वास्तव मांडण्यात आले. दोन गटातील वाद त्यातून निर्माण झालेले भांडण हे अगदी वास्तववादी पद्धतीने मांडण्यात आले . गावातील दोन गटात वर्चस्वाचे वाद वर्षानुवर्ष सुरू असतो. मात्र पाकिस्तानने सोडलेल्या यान रूपी संकटामुळे गावातील लोक एकत्र येतात. त्यातूनच त्यांना एकत्रित राहून गावाचा विकास करणे आणि आनंदाने राहणे आनंदाने जगणे राहून गेले हे पाकिस्तानचे यान हे दोन अंकी नाटकातून मांडण्यात आले आहे. नाटकाचे कथालेखन अरविंद जगताप, नाट्य लेखन विक्रांत धिवरे,दिग्दर्शक अभिजीत गायकवाड,निर्मिती सूत्रधार अक्षय अशोक, काव्य/गीत लेखन आशीश चौधरी,नृत्य दिग्दर्शन प्रतीक चंद्रमोर,पार्श्वसंगीत सुशील सुर्वे,प्रकाश योजना विक्रांत धिवरे, ढोलकी वादन वैभव गायकवाड,
संभळ वादन साहिल गायकवाड, नेपथ्य आकर्ष ललवाणी , अनिरुध पाटील, वेशभूषा अनन्या शिंदे , सपना चौधरी
रंगभूषा निकिता लोंढे, लीना चौधरी, पियानो वादन सौरभ सुमंत यांनी केले.नाटकात सचिन राठोड, सुमित देशपांडे,रुमित पाटील, दिक्षांत मोरे, प्रतीक्षा पाटील, राज लिंगायत, लीना चौधरी, काजल खैरनार,राहुल लाड, महेश बेलदार, योगेश मैड, राजस निकुंभ,आनंद गांगुर्ड़े, अक्षय शींगोटे, शरविल बक्शी, निकिता लोंढे, अभिजीत गायकवाड ,अंकिता लोखंडे, सपना चौधरी, अनन्या शिंदे, सुदर्शन शिंदे, आशीश चौधरी,पंकज कालगुडे, गिरीश शुक्ल, राजाभाऊ गायकवाड,शुभम उपासनी, ओमकार बर्वेकर,प्रतीक चंद्रमोरे,विद्या तरले, जय पाटील,मयुर इंगोले, समीक्षा भालेराव यांनी अभिनय केला.
आज सादर होणारे नाटक: खिडक्या -नाट्य भारती इंदोर