ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड
पुण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
पुणे: मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये आपल्या कसदार अभिनयाचा ठसा उमटवत रसिक मनावर अधिराज्य गाजवणारे जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 77 वर्षाचे होते, पुण्यातील मास्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या पंधरा दिवसांपासून घशात संसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील मास्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, मात्र उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता, दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या मृत्यूची अफवा सोशल मीडियावर पसरली होती, तथापि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी ते जिवंत असल्याचा खुलासा केला होता, काल त्यांनी डोळे पण उघडले होते, मात्र आज सकाळपासून त्यांची प्रकुर्ती पुन्हा खालावली होती, अखेर दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी त्यांनी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवले, अमिताभ बच्चन यांच्या सोबत त्यांनी परवान आणि अग्निपथ या चित्रपटात त्यांनी काम केले. हम दिल दे चुके सनम या मराठी चित्रपटात देखील त्यांनी काम केले, 2013 मध्ये आलेल्या अनुमती या चित्रपटासाठी त्यांना सर्वरेष्ठ अभिनयाबद्दल पुरस्कार मिळाला होता.
त्यांच्या पश्चात पत्नी वृषाली गोखले व दोन मुली असा परिवार आहे. विक्रम गोखले हे अभिनेत्यांच्या कुटुंबातील होते. त्यांची आजी अभिनेत्री होती, तर वडील चंद्रकांत गोखले हे मराठी चित्रपट आणि रंगमंच कलाकार होते.