सविता दरेकर
येणार्या सर्व दिवसांसाठी तयारीत रहा,
त्यांना सारखेच सामोरे जा.
जेव्हा ऐरण होशील तेव्हा घाव सोस,
अन् हातोडा होशील तेव्हा घाव घाल.
कुणा अनामिक कवीच्या या ओळी ’अग्निपंख’ या पुस्तकात वाचनात आल्या आणि माझ्या सुप्त मनात चेतना जागवून गेल्या…!
असंच काहीसं एक सत्य आयुष्याचा जीवनपट खोलत,नवीन लेखमाला सदर घेवुन येतेय ..या अंतरीच्या आवाजातील वेदनेचा हुंकार वाचकांच्या मनावर हळवा आघात करेन कधी विरोधही करेन…हा ज्याचा त्याचा वैचारीक अवैचारीक मानसिकतेचा प्रश्न…तर कधी बुरसटलेल्या विचारांचा पगडा गळूनही पडेल…सांगता येत नाही, ही एक आत्मकथा कोण कसे ग्रहण करेन…!
केरळहुन एक फोन आला…एक सामान्य नागरीक म्हणून,एक आत्मियतेचा हळवा आपूलकीचा, चैतन्य असलेला,हूशारी , कलागुण संपन्न आणि समाजात
माणूस म्हणून जगण्याची धडपड असलेला एक मृदू आवाज कानी पडला… ताई …!
मी फेसबुक माध्यमातून लिहीलेल्या नित्य वाचनातून लेखांवर प्रभावीत होवून तिने मला प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या…ती होती दिपिका नायडू रहाणार केरळमध्ये त्रीवेंद्रम येथील…ढीरपीसशपवशी थेाशप..!
ओळख काहीच नाही तरीही हळवी हृदयस्पर्शी आपुलकीची जाणीव झाली मनाला…ती काही सांगू बघतेय बोलू बघतेय तिची हुरहुर मांडू बघतेय जाणवले मला…नकळत पुर्व जन्मीचे ऋणानुबंध असावे जणू असे भासले…
तब्बल दोन तास मी ऐकून घेतला तिचा अंतरीचा हुंकार वेदना संघर्ष तडफड … सारं घडुनही ती कुणालाही दोष देत नाही कि तिरस्कार करत नाही किती मोठं मन तिचं जाणवलं..आपण छोटंच जाणवले तिच्या मोठेमनापुढे मला…
तिचा जीवनपट मराठीतून व्यक्त होणं तिला समाजासमोर आणण्यासाठी एक स्री स्रीला समजून घेणारी लेखनी तिला हवी होती जी माझ्यात तिला गवसली…हे माझंही भाग्यच म्हणेन… जगावेगळं काही या लेखनीतून मांडायची संधी मला मिळाली..यासाठी मनापासुन धन्यवाद दिपिका…!
मलाही बालपणापासूनच बस कुतूहल होतं ह्यांच्याकडेही सामान्य माणूस म्हणून का बघत नाही कुणी.. समाजाचा एक भाग नागरीक आणि जिवंत जाणीवा असलेला हा एक वर्ग आहे.जो उपेक्षित रहातो जगरहाटी पासुन…का? असे प्रश्न मला सतत सतावत होते… कदाचित म्हणूनच आता संधी मिळाली यावर लेखन करत दिपक मधल्या दिपिकाचा आवाज समाजापर्यंत पोहचवण्याचा…,
जन्मतः पुरुष म्हणून जन्माला आलेला दिपक किशोरवयात समजते कि त्याच्यात स्री हार्मोन्स निर्माण होतात…तो होणारा बदल तो लोकांचा व कुटुंबांतील पुरुषांच्या तिरस्काराचा सामना करताना आलेल्या अडचणींवर मात करत असतो..पण आई व तिन बहीणीचा लाडका दिपकला पाठिंबा असतो.. जबरदस्ती एकवीसाव्या वयात एक मुलीशी लग्न होते..नंतर होणारे वाद .. पत्नीचा दुसरा विवाह करुन देत मैत्रीणीत रुपांतर तरीही तिने दिलेला मोठा जीवावर बेतणारा धोका पचवत .. दिपकच्या निरागसतेचा फायदा घेणारा वासनाधीन पुरुषवर्ग अशा अनंत अडचणींवर मात करत तरुणपणात दिपकचा दिपिका होतानाचा प्रवास या लेखमालेत येणार आहे…
जी आज उच्च शिक्षित होवून यशस्वी ब्यूटिशियन आहे.. कथ्थक,भरतनाट्यम चे क्लास घेते… महीला साठी प्रेरणादायी सेमिनार घेते… आणि आनंदायी गोष्ट म्हणजे ती एका वैचारीक शिक्षित पुर्ण पुरुषाची पत्नी आहे..
हा जीवनपट वाचकांनी नक्की आत्मियतेने स्वागत करुन वाचावा.व हा अंतरीचा हुंकार पचवण्याची क्षमता ठेवून या लेखमालेचे स्वागत करावे हीच या लेखनीची अपेक्षा… धन्यवाद
सुंदर लेख आहे. पुढील लोखणासाठी शुभेच्छा.
जबरदस्त होईल ही लेखमाला