डेंग्यूच्या अळ्या आढळल्याप्रकरणी नऊशे नागरिकांना नोटीसा

मलेरिया विभागाकडून डासांची उत्पती स्थाने नष्ट करण्याचे काम सुरु
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील विविध भागात डेंगूच्या अळ्या आढळून आल्याप्रकारणी महापालिकेच्या मलेरिया विभागाने तब्बल ९१८ नागरिकांना नोटीसा धाडल्या आहेत. आतापर्यत याप्रकरणी आतापर्यन्त दोन हजार रूपये दंड वसुल करण्यात आला आहे.मागील काही दिवसांपूर्वी शहरात डेंग्यू, मलेरिया यासारखे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे नाशिक महानगर पालिकेच्या मलेरिया विभागाच्यावतीने डासांची उत्त्पती होणारे ठिकाणे नष्ट करण्याचे काम सुरु आहे.
नागरिकांनी पाणी साठवून ठेवू नये, तसेच घरात किंवा गच्चीवर असलेल्या टायरमध्ये पाणी साचून डासांची उत्त्पती होत असते, जेथे अशी ठिकाणे असतील ती नष्ट करण्याचे काम महापालिकेकडून सुरु आहे.
नाशिक शहरात कोणत्याही प्रकारे साथीचे आजार बळावता कामा नये यासाठी नाशिक महानगर पालिकेच्या मलेरिया विभागातर्फे कठोर कारवाईच्या दृष्टीने कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान  काही नागरिक वारंवार सुचना करूनही पाणी साठवून ठेवत असल्याचे दिसून आले. तसेच झाडांच्या कुंडड्याजवळ, टायरची साठवणूक करून ठेवणे अशा गोष्टी करत असल्याने महापालिकेने अशा ठिकाणी नोटीसी देवून दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. येत्या काळात नागरिकांनी डास उत्त्पतीचे ठिकाणे नष्ट न केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मलेरिया विभागाचे डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दिला आहे. अनेक साथीचे आजार होण्यास नागरिकच कारणीभूत ठरत असून प्रशासन वारंवार सुचना देवूनही त्यावर अंमलबजावणी नागरिक करत नसतांना दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. त्र्यंबके यांनी सांगितले आहे.
चौकट…
महापालिका प्रशासन शहराला रोगमुक्त ठेवण्यासाठी कटीबद्ध असली तरी नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे. नागरिक सहकार्य करत नसल्याने दंडात्मक कारवाई करावी लागत आहे. शहरात सध्या तरी साथीच्या आजारांचे रुग्ण नसले तरी बदलत्या हवामानामुळे  आजार होवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी.
डॉ. राजेंद्र त्र्यंबके, मलेरिया विभाग, मनपा
….
सहा विभागात नागरिकांना दिलेल्या नोटीसा अशापद्धतीने
सातपूर विभागात ११७ नोटीस देण्यात आल्या असून  नाशिक पूर्व विभागात २२३,  नाशिकरोड विभागात १२०, सिडको विभागात १२२, पंचवटी विभागात १७६ तर नाशिक पश्चिम विभागात १६० नोटीसी देण्यात आल्या आहेत. अशा एकूण नाशिक शहरात महापालिकेने ९१८ नोटीसी बजावल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *