सातपूर: प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर रोड येथील खादी ग्राम उद्योग येथील जंगलात बेवारस मृतदेह आढळून आल्याची घटना आज उघडकीस आली. त्र्यंबकेश्वर रोड येथील जंगल भागात मृतदेह असल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
त्र्यंबकेश्वर रोड येथील खादी ग्राम उद्योग येथील जंगलात हा प्रकार घडला आहे. जंगलाच्या 900 मिटरच्या अंतरावर एक मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत लटकत असल्याची माहिती सातपूर पोलिसांना मिळाली होती. साधारण 30 ते 32 वयोगटातल्या तरुणाचा हा मृतदेह आहे.
परंतु अनेक दिवस झाडाला फाशी घेऊन लटकलेल्या अवस्थेत पडून असल्याने तो कुजलेल्या अवस्थेत होता. यामुळे त्याची ओळख पटली नाही. दरम्यान शहरातून बेपत्ता व्यक्तींची माहिती मिळवून मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सातपूर पोलीस करत आहेत. घटनास्थळी पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते.