नाशिक : वार्ताहर
स्वच्छ सर्वेक्षण (ग्रा.) २०२३ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) चे प्रकल्प संचालक रणधीर सोमवंशी यांनी दिले असुन याअंतर्गत राज्यात १५२३ कामे पूर्ण करुन नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. नाशिकचे ७९.१९ टक्के काम पूर्ण झालेले आहे. याचवेळी लातूर, नांदेड या जिल्ह्यांचे काम चांगल्या स्वरुपात सुरु आहेत. त्या अनुषंगाने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अंतर्गत प्रथम गाव निहाय स्वयं मुल्यांकन जरी ३१ डिसेंबरपर्यंत करणे आवश्यक असले तरी मुल्यांकनाचे काम १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सुचना केंद्राकडून प्राप्त झाल्या असल्याने १५ डिसेंबरपर्यंत मुल्यांकन त्वरेने पूर्ण करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. याबाबतीत बिड जिल्ह्याने अद्यापही स्वयंमुल्यांकन सुरु केलेले नसल्याचे समोर आले आहे तर परभणी, नागपूर स्वच्छ सर्वेक्षण (ग्रा) २०२३ अंतर्गत होणाऱ्या सर्वे रायगड, सिंधुदुर्ग, जळगाव या जिल्ह्यांचे एक ही गाव क्षणासंबंधी सूचना राज्यस्तरावरुन वारंवार देण्यात आल्या स्वयं मुल्यांकनाचे पूर्ण न झाल्याचे निदर्शनास आले आहे.