नाशिक : वार्ताहर
शहरातील दुचाकी अपघाताची संख्या रोखण्यासाठी शहर पोलिसांनी १ डिसेंबर २२ पासुन हेल्मेट कारवाईला सुरुवात केली आहे. हेल्मेट कारवाईत ११ दिवसात ३ हजार ६५५ दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. १८ लाख ३४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात रस्ता अपघातात यंदाच्या वर्षी ८४ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला हेल्मेट परिधान केलेले नसल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन हे मृत्यू झाले. शहर पोलिसांनी संभाव्य घटना टाळण्यासाठी एक डिसेंबरपासून विना हेल्मेट तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत पंचवटी कारंजा, के. के. वाघ कॉलेज, रविवार कारंजा, शालीमार चौक, सातपूर कॉलनी, समृद्धी टी पॉइंट टाकली रोड, सेंट फिलोमिना स्कूल येथे सकाळी साडेदहा ते साडेबारा तसेच, दुपारी साडेचार ते सायंकाळी साडेसहा दरम्यान विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात येत आहे.