नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र शैक्षणिक प्रशासन आणि व्यवस्थापन परिषद पुणे यांच्यातर्फे देण्यात येणारा नामदार गोपालकृष्ण गोखले पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांना जाहीर करण्यात आला असून, पुरस्काराचे वितरण आज दिनांक 16 रोजी सकाळी साडेदहा वाजता करण्यात येणार आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो.स.गोसावी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सर डॉ. एम.एस.गोसावी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिग एज्युकेशन ,ट्रेनिंग ऍण्ड रिसर्च नाशिक ,स्टाफ ट्रेनिंग अकॅडमी आणि
डॉ.एम.एस .जी. फाऊंडेशन ,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मान पत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या कार्यक्रमातंर्गत स्वयंप्रकाश, स्वयंप्रेरणा या नियतकालिकाचेही प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी नाईक यांच्या हस्ते प्राध्यापक, विद्यार्थी, गुणवंतांचा गौरवही करण्यात येणार आहे.
आज सकाळी 10:30 वाजता सर एम.एस.गोसावी फार्मसी कॉलेजमध्ये हा कार्यक्रम होणार असून, यावेळी संस्थेच्या एचआर डायरेक्टर डॉ. दीप्ती देशपांडे, विश्वस्त आर.पी. देशपांडे, प्रा. बी. देवराज,डॉ. केशव शिंपी, प्रा. डॉ. राम कुलकर्णी, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉ. ज्योती ठाकूर उपस्थित राहणार आहेत.