भुसे गटाचेच शशिकांत निकम यांचा पराभव
मालेगाव:प्रतिनिधी
मालेगाव तालुक्यातील राजकियदृष्ट्या सजग असलेल्या दाभाडी गावाच्या सरपंचपदी भुसे गटाचे प्रमोद निकम यांचा दणदणीत विजय झाला आहे. तर भुसे गटाचेच दुसरे उमेदवार शशिकांत निकम यांचा पराभव झाला आहे. यातच अद्वय हिरे गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवारासहित दारुण पराभव झाला आहे. सदस्यपदाचा एकच उमेदवार निवडून आला आहे.
सरपंचपदाचे विजयी उमेदवार प्रमोद निकम व पराभूत उमेदवार शशिकांत निकम यांच्यात अटीतटीचा सामना दिसुन आला होता.दाभाडी गावाच्या थेट सरपंचपदासह १७ जागांसाठी ५७ उमेदवार उभे होते. ग्रामपालिकेसाठी तीन पॅनलसह ५ जण थेट सरपंचपदासाठी उभे होते. भुसे गटाकडून पंचायत समितीचे माजी सभापती शशिकांत निकम यांचे जनसेवा पॅनल, गिरणाकाठ फार्मर प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन प्रमोद निकम यांचे दाभाडी ग्रामविकास पॅनल व भाजप युवानेते डॉ. अद्वयआबा हिरे यांचे कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनचे संजय निकम यांच्या पॅनल बरोबरच सेनेचेच नानाभाई निकम व उध्दव ठाकरे गटाचे संयोग निकम यांच्यात लढत झाली.विजयी उमेदवार प्रमोद निकम यांना ४४८३ मते मिळाली असून शशिकांत निकम यांना ३५४२ मते मिळाली आहेत. ९४१ मतांनी प्रमोद निकम यांचा विजय झाल्यानंतर समर्थकांनी गुलाल उधळला,