ठाकरे गटाचे भाऊसाहेब चौधरी
अखेर शिंदे गटात दाखल
नाशिक: शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी तसेच ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी रात्री उशिरा शिंदे गटात प्रवेश केला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या प्रवेश सोहळ्याला पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते, चारच दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या12 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता, त्यांनतर आता थेट संपर्कप्रमुख गेल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, अजून काही जण शिंदे गटाच्या वाटेवर आहेत,