सुदृढ समाज निर्मितीसाठी ब्राह्मण संघटनांनी  कार्य करावे

माजी खासदार किरीट सोमय्या यांचे आवाहन

नाशिक  : प्रतिनिधी

देश  सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. विकसनशील असलेला भारतात आता सुबत्ता नांदत आहे.  तरीही सुदृढ आणि चांगल्या  समाजाच्या निर्मितीसाठी या आर्थिक सुबत्तेला नीतिमुल्यांची जोड देण्याकरीता ब्राह्मण संघटनांनी पुढाकार घेऊन योगदान द्यावे, असे आवाहन भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले.

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था व समाज साहाय्य सस्था यांच्यातर्फे संस्थेच्या सुवर्ण महोत्सव सांगता समारंभाचे उद्घाटन संस्थेच्या कार्यालयात बुधवारी करण्यात आले. यावेळी  प्रमुख मान्यवर म्हणून किरीट सोमय्या उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण व परशुराम मुर्तीपूजन व वेदमूर्तींच्या मंत्रोच्चरात चतुर्वेद प्रतिमा पूजनाने सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजय काकतकर, उदयकुमार मुंगी, ॲड.समीर जोशी, सुहास शुक्ल, चंद्रशेखर जोशी, सुभाष सबनीस, अनिल देशपांडे, सचिन पाडेकर, उल्हास पंचाक्षरी आदी उपस्थित होते.

सोमय्या म्हणाले , भारताच्या विकासात ब्राह्मण समाजाचे असणारे योगदान हे अतुलनीय आहे. या समाजाच्या बौद्धीक योगदानाने आर्थिक विकासालाही काळाच्या प्रत्येक टप्प्यावर साथ मिळाली आहे. जगभरातील आयटी क्षेत्रात भारताने वर्चस्व गाजविल्यानंतर आता भारत मॅन्युफॅक्चरिंग हब बनतो आहे. पण या विकासाचे सार्वत्रिकीकरण होण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत विकासाचा परिघ शहरांपुरता मर्यादीत राहतो आहे. वाड्या-वस्त्यांवर या विकासाच्या वाटा पोहोचल्या पाहिजेत, असेही सोमय्या म्हणाले.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखीय योगदान देणाऱ्या ब्राह्मण समाजातील मान्यवरांना यावेळी गौरविण्यात आले. वसुधा जोशी यांनी सुत्रसंचालन केले. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष ॲड. अविनाश भिडे यांनी प्रास्ताविक केले. गंगाधर कुलकर्णी यांनी आभार मानले.

 

यांचा झाला सन्मान

विविध क्षेत्रात उल्लेखीय योगदान देणाऱ्या ब्राह्मण समाजातील व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात राधिका पैठणकर-गाडगीळ, रेखा दाणी, साक्षी गर्गे, अनुराधा डोणगावकर, चित्रेश वस्पटे, अजित चिपळूणकर, नितीन देशपांडे, शंतनू देशपांडे आदींना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *