ठाकरे गटाला पुन्हा खिंडार

नाशिक : प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी तसेच नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. महाविकास आघाडीच्या गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बाळगलेल्या अपेक्षा पूर्ण होऊ न शकल्याने आपण बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत असल्याचे मत याप्रसंगी भाऊसाहेब चौधरी यांनी व्यक्त केले.

 

व्यसनमुक्ती केंद्राचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न

 

शिवसेनेत शाखाप्रमुख ते नाशिक जिल्हा ग्रामीण जिल्हाप्रमुख राहिलेले सुनील पाटील यांनी याप्रसंगी आपण आयुष्यभर ज्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसशी संघर्ष केला त्यांच्याबरोबर काम करताना शिवसेनेचीच पीछेहाट होत होती. त्यांच्या मांडीला मांडी लावून काम करणे असह्य होत होते. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेनेच्या नेतृत्वाकडून अशी अवहेलना करत असेल तर आपण तिथे न राहता बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वखालील काम करणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे आपण बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत असल्याचे भाऊसाहेब चौधरी यांनी म्हटले.

 

कुरघोडीत पाटलांचे निलंबन 

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौधरी यांचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षात स्वागत करत त्यांना पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कोणावर टीका करण्यापेक्षा ज्या पद्धतीने ते यापूर्वी पक्षवाढीसाठी कार्यरत होते. तसेच यापुढेदेखील ते कार्यरत राहतील, असा विश्र्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

 

लाचखोरी थांबेना, 500 रुपये लाच घेताना पोलिसाला पकडले

 

यावेळी राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे, कल्याण ग्रामीण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

 

अमरावतीत खून करून पळला नाशकात सापडला

 

ठाकरे गटात बाळासाहेबांच्या विचारांशी अवहेलना
आयुष्यभर ज्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसशी आम्ही संघर्ष केला. त्यांच्याबरोबर काम करताना शिवसेनेचीच पीछेहाट होत होती. त्यांच्या मांडीला मांडी लावून काम करणे असह्य होत होते. हे आमच्या मनाला न पटणारे होते. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना नेतृत्वाकडून अशी अवहेलना होत असल्याने आता तिथे न राहता बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वखालील काम करणे हे माझे कर्तव्य आहे. त्यानुसार आम्ही जोमाने कामाला लागू आणि शहर, ग्रामीण भागात सर्वत्र बाळासाहेबांची शिवसेना घेऊन जाऊ.
– भाऊसाहेब चौधरी, बाळासाहेबांची शिवसेना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *