भूखंड घोटाळा बाहेर काढण्यात भाजपाचा हात : अजित पवार

नागपूर :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकासमंत्री असताना 83 कोटी रुपयांचा भूखंड अवघ्या 2 कोटी रुपयांत दिला. हा घोटाळा सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी बाहेर काढला. त्यांनीच एकनाथ शिंदे यांच्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

सह्याद्री रुग्णालयास मनपाची नोटीस

 

एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित एनआयटी भूखंड घोटाळ्यावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी 83 कोटी रुपये किमतीचा भूखंड दोन कोटीला दिला. पण हे प्रकरण सर्वांत आधी कुणी बाहेर काढलं? उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात भाजपाच्या काही लोकांनी शिंदे यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. आता हीच लोकं शिंदे यांच्यासोबत आहेत, असं विधान अजित पवार यांनी केले आहे.

 

सिन्नरला बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचे शिंगरू ठार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *