21 लाख 55 हजारांचा दंड वसूल
नाशिक : प्रतिनिधी
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेने प्लॅस्टिक बंदी मोहिमेची कडक अंमलबजावणी केली आहे. जानेवारी 2022 ते डिसेंबर या बारा महिन्यात 409 केसेसमधून तब्बल 21 लाख 55 हजारांचा दंड पालिकेने वसूल केला आहे. मनपाचे सहा विभाग मिळून तब्बल 2 हजार 252 किलो म्हणजेच सव्वा दोन टन प्लॅस्टिक जप्त केले आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या सुचनेनुसार मनपाच्या सहा विभागात दररोज कारवाई सुरु आहे. दिवाळीतही सुमारे 500 किलो प्लास्टिक जप्त करीत मनपाने विशेष स्वच्छता मोहिमही राबवली होती.
मनपाचे पथक प्लॅस्टिक बाळगणा-यांवर सातत्याने कारवाई करीत आहे. दुसरीकडे ‘एकच ध्यास ठेवूया, प्लास्टिक पिशवी हटवूया, समृद्ध पर्यावरणाचे रक्षण करुया’ या घोषवाक्यानुसार जनजागृतीही केली जात आहे. ‘गुडबाय सिंगल युज प्लास्टिक, आता आपल्यामुळेच फरक पडेल’ हा विचार रुजवला जात आहे. ‘हरीत नाशिक-स्वच्छ नाशिक’चे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन मनपाच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती केली जात आहे. शहरातील स्वच्छता मोहिमांमधून प्लॅस्टिक न वापरण्याची नागरिकांना, दुकानदारांना सातत्यानं सुचना केली जात आहे. पान टपरीवर तंबाखूजन्य पदार्थ देण्याकरीता वापरला जाणारा खर्रा पन्ना वापरु नये तसचे फळविक्रेते, मांस विक्रेते यांनीही सिंगल यूज प्लॅस्टिक वापरु नये, असे आवाहन मनपाने केले आहे. प्लास्टिक बाळगणारे किंवा विकणा-यांना पहिल्यांदा पाच हजार, दुस-यांदा 10 हजार तर तिस-यांदा प्लास्टिकची विक्री किंवा खरेदी केल्यास 25 हजारांचा दंड आकारला जातोय. . महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमानेही मनपाने प्लास्टिक बंदी मोहिम राबवली आहे. नवीन वर्षामध्ये सिंगल युज प्लास्टिक वापरणार नाही, असा नागरिकांनी संकल्प करावा, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाने केले आहे.
चौकट…..
वर्षभरात झालेल्या केसेस आणि दांडात्मक कारवाई खालीलप्रमाणे
…….
जानेवारी
केसेस 35
दंड 1,95,000 रुपये
जप्त प्लास्टिक 86 किलो
………………………………………..
फेब्रुवारी
केसेस 16
दंड 80,000 रुपये
जप्त प्लास्टिक – 45 किलो
………………………………………..
मार्च
केसेस 38
दंड 1,95,000 रुपये
जप्त प्लास्टिक 95 किलो
………………………………………..
एप्रिल
केसेस 11
दंड 55,000 रुपये
जप्त प्लास्टिक 22 किलो
………………………………………..
मे
केसेस 52
दंड 2,65,000 रुपये
जप्त प्लास्टिक 295 किलो
………………………………………..
जून
केसेस 22
दंड 1,15,000 रुपये
जप्त केलेले प्लास्टिक 57 किलो
………………………………………..
जुलै
केसेस 36
दंड 1,85,000 रुपये
जप्त प्लास्टिक 293 किलो
………………………………………..
ऑगस्ट
केसेस 41
दंड 2,10,000 रुपये
जप्त प्लास्टिक 113 किलो
………………………………………..
सप्टेंबर
केसेस 34
दंड 1,70,000 रुपये
जप्त प्लास्टिक 496 किलो
………………………………………..
ऑक्टोबर
केसेस 72
दंड 3,90,000 रुपये
जप्त प्लास्टिक 553 किलो
………………………………..
नोव्हेंबर
केसेस 39
दंड 2,25,000 रुपये
जप्त प्लास्टिक 176 किलो
………………………………………..
डिसेंबर
केसेस 13
दंड 70 हजार रुपये
जप्त प्लास्टिक 21 किलो
………………………………………..
वर्षभरात एकूण केसेस – 409
दंड – 21,55,000 रुपये
जप्त प्लॅस्टिक – 2,252 किलो
………………………………………
जप्त प्लॅस्टिकवर होणार प्रक्रिया
शहरातून जमा झालेल्या प्लॅस्टिकचं रिसायकलींग केलं जातं. पाथर्डीजवळील नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पात या प्लॅस्टिकवर प्रक्रिया होते. एका प्रोजेक्टमध्ये प्लॅस्टिकपासून ग्रॅन्युअल्स म्हणजेच बारीक दाणे बनवले जातात. इतर कंपन्यांना ते देऊन त्यापासून पूर्नउत्पादन केलं जातं. तर दुस-या प्रोजेक्टमध्ये सुका कच-यातून जमा झालेल्या प्लॅस्टिकमधून इंधन निर्मिती केली जाते. त्याला ‘आरडीएफ’ म्हणजेच ‘रिफ्युज डिरॅव्हड फ्युअल’ म्हटलं जातं. हे आरडीएफ सिमेंट उद्योगाला पुरवलं जातं.