पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप

सुंदर दिसत नसल्याने केला होता खून
देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
पत्नीच्या डोक्यात फावडे टाकून खून करणार्‍या पतीला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. नाणेगाव शिवारात हिरामण निवृत्ती बेंडकुळे आणि काजल हे पती-पत्नी म्हणून मुलगा आणि मुलीसह वास्तव्यास होते.
दि.25/1/2020रोजी पती पत्नी यांच्या भांडण झाले होते. तू रंगाने काळी आहे. मला आवडत नाही. या मुद्यावरुन दोघांत कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे रागाच्या भरात हिरामणने पत्नी काजलच्या डोक्यात फावडे टाकले. यात काजलच्या डोक्यावर घाव वर्मी बसल्याने तिचा मृत्यू झाला होता. याबाबत नानेगाव पोलीस पाटील संदीप अर्जुन रोकडे यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात माहिती दिल्याने तपास करून हिरामण बेडकुळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या खटल्याचे कामकाज जिल्हा न्यायालयात चालले. बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक सहाचे न्यायमूर्ती आर. आर. राठी यांनी गुन्ह्यताील संशयित आरोपींविरुद्ध फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष, तपासी अंमलदार यांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्यांवरून गुन्हा सिद्ध झाल्याने भादवि कलम 302 मध्ये दोषी धरून त्यास जन्मठेप व 25000 रुपये दंड, दंड न भरल्यास 06 महिना साधा कारावासाची शिक्षा ठरविण्यात आली आहे. या खटल्यात सहायक सरकारी वकिल योगेश कापसे यांनी बाजू मांडली. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक तपास सपोनी मोरे ,गुळवे आदींनी पूर्णतपास करून आरोपीस सजा मिळण्यासाठी पाठपुरावा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *