महाराष्ट्र

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये १३ वर्षीय मुलावर दुर्बिणीद्वारे स्वादुपिंडाची शस्त्रक्रिया  यशस्वी

नाशिक :  अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे, प्रथमच एका तेरावर्षीय मुलावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वादुपिंडाची दुर्बिणीद्वारे  यशस्वी शास्रकीर्या  करण्यात नाशिक चे  सुप्रसिद्ध पोट व यकृत  विकार विभाग प्रमुख  डॉ तुषार संकलेचा व टीमला यश प्राप्त झाले.या प्रसंगी मेडिकल डायरेक्टर तथा नवजात शिशु व बालरोग तज्ञ्  डॉ सुशील पारख यांनी सर्व वैद्यकीय टीम चे अभिनंदन केले आहे.
   सातपूर परिसरातील वैभव गवई या १३ वर्षीय मुलाला सायकल खेळतांना सायकलचे हँडल लागून रुग्णाला पोटात असाह्य वेदना होत होत्या, रुग्णाला घराजवळच्या रुग्णालयात दाखल करून , पोटात रक्तस्त्राव झाल्याचे निदान करून  शास्रकीर्या करण्यात आली होती . तरीही रुग्णाची तब्यतीत कुठलेही सुधारणा न होता, प्रकृती अजून खालावत गेली त्यामुळे रुग्णाला अत्यावस्थेत तात्काळ अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक येथे आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. डॉ तुषार संकलेचा यांनी अत्यावस्थेतील रुग्णावर तात्काळ उपचार सुरु केले. काही प्राथमिक  चाचण्या केल्यानंतर असे  निर्दशनास आले कि,स्वादुपिंडाला सूज आलेली आहे  व स्वादुपिंडाला जोडणारी मुख्य  वाहिनेची दोन तुकडे झाले आहेत .त्यामुळे रुग्णाची आपत्काली परिस्थिती मध्ये  ERCP (Endoscopic retrograde cholangiopancreatography,) करून स्वादुपिंडाची नळी जोडण्यात आली, रुग्णाच्या पोटात अडीच लिटरची पाचकरसाने भरलेली पाण्याची थैली तयार झाली होती. यामुळे इतर अवयवांना धोका उत्पन्न झाला होता. तज्ञांसमोर रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध होते. ज्यामध्ये पहिला पर्याय म्हणजे पोटाला चीर देऊन शस्रक्रिया करणे आणि दुसरा पर्याय तोंडावाटे दुर्बिणीद्वारे उपचार करणे, या अगोदर पोटाची शास्रकीर्या झाल्याने परत शास्रकीर्या करणे हे रुग्णासाठी धोकादायक ठरले असते म्हणून दुर्बिणीच्या साह्याने शास्त्रकिया करण्याचे ठरवण्यात आले.      तज्ज्ञांना त्यांच्या कौशल्यावर आणि अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथील अत्याधुनिक यंत्रणेवर पूर्ण विश्वास असल्याने त्यांनी रुग्णाचे वय लक्षात घेता, दुर्बिणीद्वारे द्वारे उपचार करण्याचा पर्याय निवडला. जर दुर्बिणीद्वारे हे अवघड कार्य करणे शक्य झाले नाही  तर शास्रकीर्या करावी  लागणार हि पूर्व कल्पना कुटूंबियातील मंडळींना आधीच देण्यात आली होती.  यासाठी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथील नामवंत पचनसंस्थेचे शल्य विशारद डॉ जी बी सिंग यांना सुद्धा पूर्व सूचना देऊन तयार ठेवण्यात आले होते.       डॉ तुषार संकलेचा यांनी दुर्बिणीद्वारे पोटाला आरपार छिद्र पाडून व पित्तरसाचा थैलीला छिद्र  पाडून  एक नळी आरपार टाकण्यात आली . व पित्तरसाला पोटात वाट मोकळी करून ( Drainage) देण्यात टीमला यश आले.  अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करून (Endoscopic Cystogastrostomy) संपूर्ण पित्तरसाची थैली पोटाची ओपन शस्त्रक्रिया न करता दुर्बिणीद्वारे संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली.    या मध्ये शल्य विशारद तज्ञ्  डॉ जी बी सिंग , भूलतज्ञ् डॉ केतन , बालरोग तज्ञ्  डॉ सुशील पारख ,डॉ  नेहा मुखी , डॉ किरण  मोटवाणी , व संपूर्ण एन्डोस्कोपी टीम यांचे  प्रयत्न व सहकार्यामुळे हि अवघड शास्रकीर्या करण्यात टीमला यश आले.  संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  याबद्दल गवई परिवाराने समाधान व्यक्त केले.  सोबतच डॉक्टर आणि अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिकच्या सर्व कर्मचाऱ्याचे आभार त्यांनी मानले
   जलद आणि अचूक निदान यांच्या जोरावर आपण अतिशय किलिष्ठ आजारावर देखील निसंकोच परिणामकारक उपचार करू शकतो आणि त्यामुळे उपचारासाठी पूर्वी मुंबई पुणे या महानगरात जावे लागत होते. ते सर्व उपचार आता एका छताखाली अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये मिळत आहेत म्हणून अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल सर्वसमावेशक पर्याय म्हणून पुढे आले आहे
डॉ सुशील पारख – मेडिकल डायरेक्टर तथा नवजात शिशु व बालरोग तज्ञ् , अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल ,नाशिक
सर्व सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळे, अगदी लहान मुलांपासून ते सर्व वयाच्या रुग्णांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यात आम्ही कौशल्य प्राप्त केले आहे. सदर रुग्णाच्या उपचारात या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग केल्यामुळे रुग्ण संपूर्ण पणे बरा झाला आहे .
समीर तुळजापूरकर – केंद्र प्रमुख, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक
Bhagwat Udavant

Recent Posts

सातपूरला ज्योती स्ट्रक्चर कंपनीला आग

सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या  आगीचे कारण…

13 hours ago

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…

2 days ago

जीएम साहेब येता दारी तोच दिवाळी दसरा

मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…

2 days ago

ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम !

ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…

2 days ago

पारा ५.७ अंशांवर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर!

पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड :  प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…

4 days ago

निफाडला नीचांकी ५.६ अंश तपमान

निफाडला निचांकी ५.६ अंश तपमान निफाड।प्रतिनिधी निफाड शहरासह तालुक्यात पारा घसरण सुरुच आहे सोमवार दि…

5 days ago