वनारवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
जोपूळला एक बिबट्या पकडण्यात वनविभाग यशस्वी
दिंडोरी (प्रतिनिधी ) दिंडोरी तालुक्यातील पूर्व भागातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर पसरल्याने अनेक गावांतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून तालुक्यातील वनारवाडी येथे आज सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास येथील खंडेराव डोंगर परिसरात विठ्ठल भिवा पोतदार या १६ वर्षीय मुलावर बिबट्याने अचानक हल्ला करून ठार केल्याने वनरवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
यावेळी परिसरात असलेल्या नागरिकांनी आरडाओरडा करताच बिबट्याने धूम ठोकली त्यानंतर सरपंच दत्तू भेरे यांनी याची तात्काळ दखल घेऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून या ठिकाणी प्रचारण केले असता त्यांनी या मुलाला तात्काळ दिंडोरी येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी ग्रामस्थांनी हळहळ व संताप व्यक्त करून या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
तसेच जानोरी गावामध्ये आठ दिवसापासून अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बिबट्याचे वावर दिसत असल्याने जानोरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जानोरी येथील माजी उपसरपंच गणेश तिडके यांच्या शेतात दिवसा ढवळ्या बिबट्याचे आवाजाच्या डरकाळ्या आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तरीपण वन विभागाने जानोरी येथे कोणतीही मोठी घटना होऊ नये या आधी बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी जानोरी येथील ग्रामस्थांनी मागणी केली आहे. तसेच वनविभागाने गणेश तिडके यांच्या शेताजवळ बिबट्याचा शोध घेण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले आहे.
तसेच जोपुळ येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याने जोपुळ येथील ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
पोलिसांपासून बचाव करण्यासाठी त्याने बदलले तब्बल 65 सिमकार्ड तीन वर्षांपासून फरार पोक्सो गुन्ह्यातील आरोपीला अटक…
डम्परच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यातील चांदोरी जवळ आज दि…
राजकारणात सध्या एक ट्रेंड सुरू असून, पक्षाला जोपर्यंत सुगीचे दिवस आहेत तोपर्यंत पक्षाशी आपण किती…
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला वेग आला आहे. प्रत्येक…
नीट परीक्षेत अपेक्षेइतके गुण मिळाले नाहीत म्हणून साधना भोसले या पोटच्या मुलीला मुख्याध्यापक असलेल्या पित्याने…
इंदापुरात अविस्मरणीय रिंगण सोहळा इंदापूर : पंढरपूरला निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा काल…