अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात असमान फळधारणा, गुणवत्तेवर परिणाम
लासलगाव : समीर पठाण
गेल्या अनेक वर्षांपासून वातावरणातील बदल तसेच अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे राज्यात द्राक्षपट्ट्यावर मोठा परिणाम झाला आहे. सतत ओल्या हवामानामुळे बुरशीजन्य संसर्ग आणि असमान फळधारणा होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या द्राक्षांच्या गुणवत्तेवर आणि निर्यात क्षमतेवरही परिणाम होईल, असा इशारा कृषितज्ज्ञांनी दिला आहे.
महाराष्ट्राची द्राक्षांची राजधानी असलेले नाशिक हे अलीकडच्या काळातील सर्वांत वाईट हंगामातून जात आहे. मेपासून सुरू असलेल्या सतत पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. शेतकर्यांचा अंदाज आहे की, द्राक्ष उत्पादनात जवळपास 40 टक्क्यांनी घट होऊ शकते. त्यामुळे कापणीच्या हंगामात लक्षणीय विलंब होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे द्राक्षबागांमध्ये पाणी साचले आहेच, शिवाय द्राक्षांच्या वाढीचे चक्रही विस्कळीत झाले आहे. दीर्घकाळ पडलेल्या पावसामुळे प्रतिएकर सुमारे 10 ते 12 टन नुकसान होण्याची शक्यता आहे, तसेच अनेक द्राक्षबागांना
फुले कमी पडल्याने आणि द्राक्षांच्या घडांची अकाली गळती झाल्याने मोठा फटका बसला आहे.
सतत ओल्या परिस्थितीमुळे बुरशीजन्य संसर्ग आणि असमान फळधारणा होऊ शकते. त्यामुळे नाशिकच्या द्राक्षांच्या गुणवत्तेवर आणि निर्यात क्षमतेवरही परिणाम होईल, असा इशारा कृषितज्ज्ञांनी दिला आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण सुमारे 30 टक्के नुकसान झाल्याचा अंदाज आधीच लावण्यात आला आहे; परंतु शेतकर्यांचे म्हणणे आहे की, नुकसानाची संपूर्ण रक्कम अद्याप मोजली गेलेली नाही.
पुरवठा अन् निर्यातीवर परिणाम
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या द्राक्ष पट्ट्यावर वातावरणातील बदल तसेच अवकाळी पाऊस व अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाला आहे. या वर्षी सुमारे 15 टक्के द्राक्षबागांमध्ये फळधारणा दिसून आली नाही. फक्त द्राक्षांची वाढ दिसून आली. भारताच्या द्राक्ष निर्यातीत महत्त्वपूर्ण योगदान देणार्या उद्योगासाठी ही चिंताजनक बाब आहे. आगामी कापणीचा हंगाम अनिश्चित असल्याने, नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांना मागील वर्षामध्ये अनुभवलेल्या संकटाची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे. कारण देशांतर्गत पुरवठा आणि निर्यात दोन्हींवर मोठा परिणाम होण्याची
शक्यता आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन
कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणानुसार, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू आणि मिझोरम ही भारतातील प्रमुख द्राक्ष उत्पादक राज्ये आहेत. महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. एकूण द्राक्ष उत्पादनाच्या 67 टक्क्यांहून अधिक उत्पादन महाराष्ट्राने घेतले आहे आणि 2023-24 दरम्यान सर्वाधिक उत्पादकता नोंदवली आहे.