महाराष्ट्र

नाशिक मध्यच्या मतदार यादीत मोठा घोळ

नाशिक मध्यच्या मतदार यादीत मोठा घोळ
आ. फरांदे यांचे निवडणूक अधिकार्‍यांना निवेदन
नाशिक  ः प्रतिनिधी
नाशिक मध्य मतदार संघातील मतदार यादीत घोळ असून, सर्व यादीचे पुनर्परिक्षण करण्यात यावे, याबाबत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना आतापर्यंत तीन वेळा स्मरण पत्र दिले आहेत. तरीही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. एकाच घरातील नावे विविध मतदान केंद्रांवर टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांना मतदान करताना अडचणी येणार आहेत. त्यामुळे मतदार यादी तातडीने दुरुस्त करावी, या मागणीचे निवेदन आमदार देवयानी फरांदे यांनी काल निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिले.
काल (दि.18)जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक  निर्णय अधिकारी (नाशिक मध्य) यांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत पाच जूनपासून मतदार याद्यांचा घोळ,दुबार नोंदणी,मृतव्यक्ती जिवंत असल्याचे दाखविणे अशा अनेक त्रुटींबाबत वारंवार निवडणूक अधिकारी,प्रांत,तहसिलदार यांना स्मरणपत्रे देत याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले.
नाशिक मध्य विधानसभा मतदार संघामधील मतदार यादी पुनर्परिक्षण,मतदार यादीत योग्य नावे समाविष्ट करण्याबाबत नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक मध्यचे निवडणूक अधिकारी अर्पित चौहान ,आणि तहसिलदार  शोभा पुजारी यांची भेट घेत मतदार याद्यांमधील घोळ, दुबार नावे,मालेगाव मध्य मधील स्थलांतरितांची यादी,वडाळा येथील मतदार नावनोंदणीची प्रक्रिया अपूर्ण आदी तक्रारी केल्या.  निवडणुकीपूर्वी योग्य ती कार्यवाही करण्याबाबत निवदेन दिले. यावेळी इतर धर्मीय नागरिकांची मृत्यूची नोंद महापालिकेत होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभेच्या निकालानंतर पाच जून पासून नाशिक मध्य विधानसभा मतदार संघामध्ये जवळपास 20996 दुबार नावांची बुथनिहाय यादी नाशिक तहसिलदार कडे जमा केली आहे. त्यानंतर 8 तारखेला परत पत्रव्यवहार करीत ज्यांची नावे 2019च्या लोकसभा  निवडणुकीच्या यादीत होती परंतु 2024 च्या निवडणुकीच्या वेळी नव्हती अशी जवळपास 18 हजार नावे बुथनिहाय देण्यात आली. त्यावरचा अहवाल अजून प्राप्त झाला नसल्याचे फरांदे यांनी सांगितले. दुबार आणि अपूर्ण नावांबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. सारखे असणारे फोटो ,पीएससी नंबर सारखा अशी 1627 नावे लक्षात आणून दिली. यावर अद्याप कारवाई झाली नाही. त्यानंतर मालेगाव मध्य मधील 700 मतदारांची नावे मध्य मतदार संघात टाकली आहे. नाशिक पश्चिम मतदार संघातील नावे मध्य मतदार संघामध्ये आहे. सादिक नगर,मेहबुब नगरचा वडाळाच्या पलिकडचा भाग त्यातील 800 फॉर्म भरून ते  नाशिक तहसिलदारांकडे निवडणूक घोषीत होण्यापूर्वी जमा केलेले आहे. या सर्वच विषयांच्या बाबतीत अजूनपर्यत कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. कॅम्पमध्ये नोंदणी करूनही त्यांचे फॉर्म नामंजूर झाले आहेत. अशा विविध तक्रारी असून याबाबत अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता अ‍ॅप स्लो असल्याचे कारण देण्यात आले होते.  यंत्रणा कमी असल्यास योग्य ती उपाययोजना करावी आदी सूचना  करण्यात आल्याचे फरांदे यांनी सांगितले.
ठाकरे गटानेही सत्ताधार्‍यांच्या दबावापोटी दुबार बोगस मतदारांची नावे नाशिक मध्यमध्ये नोंदविल्याचा आरोप केला होता. यावर उत्तर देतांना फरांदे यांनी आरोप फेटाळून लावत विरोधक  फेक नेरेटिव्ह सेट करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. विरोधकांनी विकासाच्या मुद्यावर बोलावे ,निवडणूका लागल्यावर आरोप केले जातात.निवडणुका  आल्या की मतपेट्यांवर ,मशीनवर आक्षेप घ्यायचा नाशिक मध्य विधानसभा मतदार संघामध्ये गेली 10 वर्ष काम करीत आहे. मी विकासावर निवडणूक लढवित आहे. विरोधकांनी विकासावर बोलावे.खोटे आरोप थांबवावे. निवडणुकीच्या पुरवणी यादीमध्ये सुधारणा करावी. निवडणूक अधिकार्‍यांनी पुराव्यांच्या आधारावर लवकरात लवकर ही समस्या सोडवावीअसे  फरांदे यांनी सांगितले.
मनपाकडे मृत व्यक्तींची यादीच नाही
गेल्या दहा वर्षात कब्रस्थानमधून मृत व्यक्तींची यादी आलेली नाही. कुठल्याही धर्माच्या व्यक्तीचा मृत्यू  झाल्यानंतर त्याची नोंद नाशिक महानगरपालिकेकडे असणे गरजेचे आहे. याबाबत विभागीय अधिकार्‍यांकडे यादी जमा करून निवडणूक अधिकार्‍यांकडे द्यावी. गेल्या दहा वर्षातील यादी विभागीय अधिकार्‍यांकडून मागवावी. यादी चुकीच्या पद्धतीने कोणी सादर करीत असेल त्यांच्यावर कारवाई करावी.
Devyani Sonar

Recent Posts

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

9 hours ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

16 hours ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

17 hours ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

17 hours ago

‘सचेत’ अ‍ॅप देणार आपत्तीची माहिती

अ‍ॅपचा वापर करण्याचे पंतप्रधानांकडून आवाहन नाशिक : प्रतिनिधी नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसह ऊन व पावसाची माहिती…

17 hours ago

वडनेरला द्राक्ष उत्पादकाची पंधरा लाखांची फसवणूक

पिंपळगावच्या व्यापार्‍याविरोधात गुन्हा दाखल चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडनेरभैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याची तब्बल 15…

17 hours ago