दोन हजारांची लाच घेताना
सुरगाण्यात सेतू कर्मचारी जाळ्यात
नाशिक : प्रतिनिधी
रेशनकार्ड स्वतंत्र करण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना सेतू कर्मचार्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
सीताराम बनश्या पवार (35) रा. रानविहिर,पो. सतखांब, ता. सुरगाणा , नाशिक असे या लाचखोर सेतू कर्मचार्याचे नाव आहे.
तक्रारदाराकडे आरोपीने रेशनकार्ड स्वतंत्र करण्यासाठी प्रकरण दिले होेते. या लाचेची रक्कम सुरगाणा येथील सेतू कार्यालयात स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले असून, आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे. पोलीस उपअधीक्षक
श्रीमती वैशाली पाटील, हवालदार शरद हेंबाडे, प्रफुल्ल माळी, संतोष गांगुर्डे, परशुराम जाधव, विलास निकम, अविनाश पवार यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.