सावकार वैभव देवरेच्या जाचाला कंटाळून
डीएसपी बासुंदी चहा’ फेम व्यावसायिकाची आत्महत्या
सिडको विशेष प्रतिनिधी
सावकारीच्या जाचाला कंटाळून ‘डीएसपी बासुंदी चहा’ फेम व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नांदुरी घाटाजवळील जंगलात १५ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृतदेह सापडला असून त्यांच्याजवळ आत्महत्येची कारणीभूत ठरणारी चिठ्ठीही सापडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत धीरज पवार यांनी बेकायदेशीरपणे सावकारीचा धंदा करणा-या वैभव देवरे याच्याकडून एप्रिल २०२३ मध्ये १२ लाख रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. सुरुवातीला व्यवस्थित हप्ते फेडले; मात्र नंतर काही आर्थिक अडचणींमुळे ते शक्य झाले नाही. याचा गैरफायदा घेत वैभव देवरे आणि त्याच्या साथीदारांनी धीरज यांना धमक्या देणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे असे प्रकार सुरू केले.
व्याजाने घेतलेली रक्कम न दिल्यास कळवण तालुक्यातील वडीलोपार्जित जमीन लिहून देण्याचा दबाव टाकला जात होता.
आणि याच वैभव देवरे याच्या जाचाला कंटाळून धीरज पवार याने आत्महत्या केली असुन वैभव देवरे याच्याकडून होणा-या जाच्याला कटांळुन मी आत्महत्या करत असल्याचे मयत धीरज याने मृत्युपुर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती दरम्यान याबाबत मयत धीरजची पत्नी गीतांजली धीरज पवार यांनी पतीच्या मृत्युनंतर गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. वैभव देवरे, त्याची पत्नी सोनल देवरे आणि त्यांचा साथीदार निखील पवार असे तक्रारीत नावे आहेत.दरम्यान, वैभव देवरे विरोधात इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वीही बेकायदेशीर सावकारीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, जामिनावर तो पुन्हा त्याच धंद्यात सक्रिय झाल्याचे समोर आले आहे.
मनमाड : प्रतिनिधी सध्या देशात पाकिस्तान विरुद्ध आहे भारतातील अनेक शहरांवर पाकिस्तानने मिसाईल व ड्रोन…
शिलापूर : नाशिक रोड रेल्वे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेने चोरी झालेली मोटारसायकल जुन्या जनरल तिकीट घराजवळ मिळून…
वाहनधारकांची गैरसोय होण्याची शक्यता, तांत्रिक दुरुस्तीचे प्रयत्न सुरू मनमाड : प्रतिनिधी मनमाडच्या पानेवाडीत असलेल्या हिंदुस्थान…
नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल, औषधसाठा जप्त पळाशी : वार्ताहर अॅलोपॅथीची वैद्यकीय पदवी अथवा परवाना जनतेच्या…
सिन्नर : प्रतिनिधी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर नागपूर येथून देवनार-मुंबईकडे 21 म्हशी घेऊन जाणार्या आयशरने डाव्या…
वीजपुरवठा खंडित, घरांचे पत्रे उडाले, पिकांचे नुकसान; भरपाईची मागणी दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यासह सुरगाणा,…