ठेंगोडा येथील तलाठी, मंडल
अधिकार्यावर लाचप्रकरणी गुन्हा
तक्रारदाराकडे मागीतले पंधरा हजार
नाशिक : प्रतिनिधी
सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी पंचवीस हजारांची लाच मागून पंधरा हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविणार्या ठेंगोडा येथील तलाठी आणि मंडल अधिकार्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
ठेंगोडा येथील तलाठी योगेश ज्ञानेश्वर जाधव यांनी मंडल अधिकारी संजय साळी यांच्या सांगण्यावरुन तक्रारदाराकडे सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी पंचवीस हजारांची लाच मागीतली होती. परंतु तक्रारदाराने पंधरा हजार देण्याची तयारी दर्शविली होती. तक्रारदाराने यासंदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सापळा अधिकारी अनिल बडगुजर, हवालदार दीपक पवार, प्रभाकर गवळी, पोलिस शिपाई संजय ठाकरे, चालक विनोद पवार, परशुराम जाधव यांनी तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.