येवला : प्रतिनिधी
तालुक्यातील अंदरसूल येथील हायवे रोडवर सोलर प्लेट घेऊन जाणारा कंटेनर उलटल्याने येथील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती. सदर अपघातामुळे वाहतुकीची कोंडी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला, मात्र कंटेनरमधील सोलर प्लेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले रस्त्यावर कंटेनर उलटल्यामुळे येवला-वैजापूर रोडवरील वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळबली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने सदर वाहन चालकाला आपले वाहन बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. गवंडगाव टोलनाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, शिर्डी अहिल्यानगर महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक संभाजीनगर महामार्गावर वळवण्यात आल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. पोलिसांनी अंदरसूल येथे घटनास्थळी भेट देऊन सदरची वाहतूक सुरळीत केली.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…