बावनकुळेंच्या उपस्थितीत आज सातपूरला ओबीसींचा मेळा

नाशिक : प्रतिनिधी
ओबीसी नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज बुधवारी (दि.27)नाशिक दौर्‍यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत शहरात दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नाशिक महानगर भाजप अध्यक्ष गिरीश पालवे व ओ बी मोर्चा नाशिक महानगर अध्यक्ष चंद्रकांत थोरात यांनी दिली.राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात रखडलेले ओबीसी आरक्षण नव्याने गठीत झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चातुर्यामुळे ओबीसी आरक्षण कायदेशीर मार्गाने राज्यातील ओबीसी समाजाला बहाल करण्यात आले. यात महाविकास आघाडी सरकार पुरते कसे अपयशी आहे आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले परिश्रम हे यशस्वी झाल्याने ओबीसी नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा नाशिक येथे दौरा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 11.00 ते 11.30 वा भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद, दुपारी 12.00 ते 2.00 ओबीसी मेळावा – रेशीमगाठी मंगल कार्यालय सातपूर, 3.ते 5.00 वा. – युवा वॉरियर्स शाखा उदघाटन, पंचवटी. सायं.5.10 ते 6.00 वा. – सभा मंडप उदघाटन – सिडको या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आवाहन केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *