देवगाव येथे कर्जफेडीच्या विवंचनेतून शेतकऱ्याने संपवलं आयुष्य
लासलगाव:समीर पठाण
शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येत नसल्याच्या विवंचनेतून दत्तात्रय सुखदेव निफाडे (वय ५२) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना निफाड तालुक्यातील देवगाव येथे घडली.
याबाबत मृत दत्तात्रय निफाडे यांचा मुलगा चंद्रकांत निफाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय निफाडे यांची देवगाव शिवारात २ एकर शेती आहे. निफाडे यांनी देवगाव नागरी सहकारी पतसंस्थेकडून ४ लाख १० हजार, कॅनरा बँक निफाड शाखेतून पत्नीच्या नावे २ लाख व मुलाच्या नावे २ लाख रुपये कर्ज घेतले होते. तसेच नातेवाईक व मित्राकडून ४ लाख रुपये हातउसने घेतले होते. शेतात लागवड केलेले टोमॅटो आणि कांदा बाजारपेठेत विकून उत्पादन खर्चही निघाला नाही. त्यामुळे घेतलेले कर्ज फेडायचे कसे? या विचाराने ते काही दिवसापासून तणावात होते. त्यातूनच सोमवार दि.१६ सकाळी ११.३० सुमारास दत्तात्रय निफाडे यांनी शेतातील स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.
घटनेची माहिती पोलीस पाटील सुनील बोचरे यांनी लासलगाव पोलीस स्टेशनला कळविली. लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. स.पो.नि.राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लहानु धोक्रट, पोलीस नाईक संदिप शिंदे व औदुंबर मुरडनर अधिक तपास करीत आहे.
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…