नाशिक : प्रतिनिधी
हॉस्पिटल मधील बायो वेस्ट (जैविक) कचरा सार्वजनिक रस्त्यावर टाकल्या बाबत त्यांच्यावर रक्कम रुपये पंचवीस हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.
महापालिका आयुक्त रमेश पवार यांच्या आदेशान्वये व संचालक घनकचरा व्यवस्थापन विभाग डॉ. आवेश पलोड , आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ बापूसाहेब नागरगोजे व पश्चिम विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ही कारवाई करण्यात आली नाशिक पश्चिम विभागा अंतर्गत असलेल्या शरणपूर रोड वरील डॉ. वसंत दराडे हॉस्पिटल मधून हा कचरा टाकण्यात आला होता. यावेळी विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी, स्वच्छता निरीक्षक राजू गायकवाड कर्मचारी वृंद उपस्थित होते.