महाराष्ट्र

सव्वा लाखाचा सोन्याचा हार लंपास

नाशिकरोड :  प्रतिनिधी
गाडीतून सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचा सोन्याचा पोहे हार चोरट्याने लंपास केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अभिजीत अशोक सोमय्या (रा. वजीराबाद जिल्हा नांदेड) यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी म्हटले की, आपल्या बहिणीने  (एम एच 15 डी एम 28 37 ) या गाडीमध्ये नाशिकरोड परिसरात असलेल्या अमृततुल्य चहाच्या समोर असलेल्या इडली वडापाव हॉटेलच्या बाजूला गाडी लावली असता, अज्ञात चोरट्याने गाडीमध्ये ठेवलेल्या पर्समध्ये असलेला एक लाख 24 हजार रुपये किमतीचा सोन्याचा पोहे हार चोरून नेला. या घटनेप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार खैरे हे करत आहे.
Ashvini Pande

Recent Posts

घर क्रमांक प्लेटसाठी गटविकास अधिकार्‍याच्या पत्राने आश्चर्य

एजन्सीमार्फत वसुली; पत्र परत घ्या, अन्यथा आंदोलन : चारोस्कर दिंडोरी : प्रतिनिधी ग्रामपंचायत हद्दीतील घरांना…

5 minutes ago

40 वर्षांनंतर रस्त्याचा तिढा अखेर सुटला

श्रमदानातून नगरसूलच्या महाले वस्तीवर रस्ता तयार नगरसूल : प्रतिनिधी येथील महाले वस्तीवरील गेल्या चाळीस वर्षांपासून…

11 minutes ago

सिन्नरला पर्यावरणदिनी भाजपा उद्योग आघाडीची जनजागृती रॅली

कापडी पिशवी वाटपासह प्लास्टिक बंदीचे आवाहन सिन्नर ः प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भाजपा…

16 minutes ago

सरस्वती गटारगंगा तर शिवनदीला पाणवेलींचा विळखा

सिन्नरकरांची अनास्था अन् प्रशासनाचे दुर्लक्ष सिन्नर ः प्रतिनिधी तीन-तीन नद्यांचा सहवास लाभलेल्या सिन्नरकरांची अनास्था अन्…

24 minutes ago

आडगाव परिसरात घरफोडी; सव्वापाच लाखांचे दागिने व रोकड लंपास

सिडको : विशेष प्रतिनिधी आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची एक गंभीर घटना समोर आली असून,…

34 minutes ago

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कोम्बिंग ऑपरेशन

283 गुन्हेगारांची तपासणी; दोन व्यक्ती घातक शस्त्रांसह ताब्यात सिडको : विशेष प्रतिनिधी बकरी ईद सणाच्या…

48 minutes ago