हभप पंडीत महाराज कोल्हे यांचा उपक्रम; तृतीय आवृत्तीचे प्रकाशन
नाशिक : प्रतिनिधी
श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज सप्त शतकोत्तरी सुवर्ण जयंती महोत्सव व अधिक मासा निमित्ताने श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज अभंग गाथेच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन निवृत्तीनाथ महाराज मंदिरातपार पडले.
हभप. भागवताचार्य माधवदास महाराज राठी, महंत संपतराव धोंगडे, जगतापअप्पा, गाडेकरनाना,पोटेअप्पा आदी मंडळी यावेळी उपस्थित होती. संप्रदायामध्ये गुरुपीठ आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू असलेले निवृत्तीनाथ महाराज यांची अभंग गाथा घराघरामध्ये पोहोचावी. गावा गावातील सप्ताहामध्ये पारायण व्हावे, यासाठी आई वडिलांच्या स्मरणार्थ संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर संस्थानचे माजी अध्यक्ष हभप.पंडित महाराज कोल्हे हे विनाशुल्क देत आहेत. अभंग गाथा पूर्ण पाठांतर करणार्या साधकांस आई वडिलांच्या स्मरणार्थ निवृत्तीनाथांची सुवर्ण प्रतिमा दिली जाईल, असे पंडित महाराज कोल्हे यांनी प्रकाशन प्रसंगी सांगितले.
घरा घरामध्ये नाथाचा ग्रंथ. फोटो दिसला पाहिजे आणि नाथांची आरती घरा घरामध्ये झाली पाहिजे, असा त्यांचा मानस आहे. नाथाच्या मंदिरात सुरु असलेल्या भागवत सप्ताहामध्ये पारायणासाठी 75अभंग गाथा देण्यात आल्या. गेल्या बारा वर्षांपासून ते हे कार्य करीत आहेत. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.