नाशिक

न्याहारीचा घास तोंडात; मृत्यू मानगुटीवर!

झटापटीत विहिरीत पडून एकाचा बिबट्यासह अंत

सिन्नर : प्रतिनिधी
कष्ट, घाम आणि रोजच्या मजुरीवर जगणार्‍या एका शेतमजुराच्या आयुष्याचा शेवट इतका विदारक असेल, याची कुणालाही कल्पना नव्हती. शिवडे (ता. सिन्नर) येथे रविवारी सकाळी घडलेली घटना केवळ अपघात नसून, ग्रामीण भागातील माणूस-वन्यजीव संघर्षाचे भयावह वास्तव उघड करणारी ठरली. न्याहारीसाठी बसलेल्या शेतमजुरावर पाठीमागून बिबट्याने झडप घातली. जीव वाचवण्यासाठी झालेल्या झटापटीत शेतमजूर आणि बिबट्या थेट विहिरीत कोसळले आणि दोघांचाही मृत्यू झाला.
सावता माळीनगर येथील गोरख लक्ष्मण जाधव (वय 43) शिवडे येथील शेतकरी गणपत अमृता चव्हाणके यांच्या गट नंबर 811 मधील शेतात गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. सकाळी साधारण दहा वाजता विहिरीलगतच्या आंब्याच्या झाडाखाली बसून ते न्याहारी करत होते. याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या मानगुटीवर झडप घातली. क्षणात शांत शिवारात किंकाळ्या, धावपळ आणि जीवघेणी झटापट सुरू झाली.
जाधव आणि बिबट्यामध्ये प्रचंड झटापट झाली. अवघ्या दहा फुटांवर असलेली, मात्र कठडे नसलेली विहीर मृत्यूचा सापळा ठरली. झटापटीत दोघेही थेट विहिरीत कोसळले. शेजारील शेतात कांद्याची रोपे उपटणार्‍या महिलांनी हे दृश्य पाहताच मदतीसाठी आरडाओरड केली. ग्रामस्थांनी धाव घेतली. मात्र, विहिरीत असलेल्या विद्युत पंपाच्या फाउंडेशनवर थकलेला बिबट्या बसल्याने कुणालाही खाली उतरता आले नाही. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, ’आधी शेतमजुराचा जीव घेणार्‍या बिबट्याला ठार करा, त्यानंतरच मृतदेह बाहेर काढा,’ अशी आक्रमक भूमिका स्थानिक ग्रामस्थांनी घेतली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. तब्बल तीन ते चार तास सहाय्यक वनसंरक्षक कल्पना वाघेरे, वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर, मोबाईल स्क्वॉडच्या सातारकर यांच्यासह वनविभाग आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू होती.अखेर वनविभागाने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला जेरबंद केले. मात्र पिंजरा बाहेर काढण्यास ग्रामस्थांनी विरोध केला. त्यानंतर पट्टीचे पोहणारे गोविंद तुपे यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सुमारे 6 परस पाणी असलेल्या विहिरीत उतरून त्यांनी गोरख जाधव यांचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.दरम्यान, मृतदेह बाहेर काढताना विहिरीतील पिंजरा वारंवार पाण्यात बुडाल्याने पिंजर्‍यात अडकलेल्या बिबट्याच्या नाका-तोंडात पाणी गेले आणि अखेर त्याचाही मृत्यू झाला. बिबट्याचा मृतदेह शव विच्छेदनासाठी मोहदरी वन उद्यानात पाठवण्यात आला होता. या संपूर्ण घटनेची सिन्नर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सिन्नर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी तैनात होते.

 

A morsel of breakfast in the mouth; death on the neck!

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago