उन्हापासून बचावासाठी घेतला जातोय आधार
नाशिक : प्रतिनिधी
मार्च अखेरीलाच उन्हाचा कडाका वाढल्याने उन्हाच्या प्रखर किरणांपासून बचावासाठी नागरिक सावली शोधताना दिसत आहे.
इतर शहरांच्या तुलनेत झाडांचे प्रमाण नाशिकमध्ये अधिक असले तरी गेल्या काही वर्षात शहराचा झपाट्याने विकास होत असल्याने झाडांचीही मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली आहे. विकासासाठी झाडांची अडचण वाटत असली तरी उन्हाळ्यात मात्र सावलीसाठी वृक्षांची शोधाशोध केली जात आहे.
विशेष करून वाहनधारकांकडून रस्त्यावर लागणार्या तीस सेकंदाच्या सिंग्नलसाठीही सावली शोधण्यात येत आहे..परिणामी सिंग्नल सुरू होणार असे आढळल्यास दुचाकी सिग्नल जवळ असलेल्या झाडांच्या सावलीत थांबण्यासाठी अट्टास करत आहे. तर सिटीलिंक बस अथवा रिक्षाची वाट पाहणारा वाटसरूही झाडांच्या सावलीचा आधार घेत आहेत. त्यामुळे सध्या शहरात सावलीतील जागा मिळणे अशक्य झाले आहे.
मुक्या प्राण्यांना झाडांचा आधार
उन्हामुळे जीवाची काहिली होत असताना मुक्या प्राण्यांना कॉंक्रिटच्या जंगलात सावलीमध्ये नागरिक उभे राहू देत नाही .त्यामुळे मुके प्राणीही वृक्षांच्या सावलीत थांबत उन्हापासून बचाव करताना दिसत आहेत.
झाडांचे महत्त्व अधोरेखित प्रत्येक जण विकासाच्या दिशेने धावत असताना शहराचा अधिकाधिक विकास कसा होईल .याचाच प्रत्येक जण विचार करतो. शहरात मोठ्या कंपन्या ,उद्योग ,मॉल,थेटर आवश्यक असले तरी वृक्ष आणि वृक्षांकडून मिळणारी सावली,हवा यांची जास्त गरज असल्याचे महत्त्व अधोरेखित होत आहे.
झाडांच्या खाली वाहनांची पार्किंग
सध्या शहरात असलेल्या प्रत्येक झाडाखाली वाहनांची पार्किंग केलेली दिसत आहे. तसेच नागरिकही झाडांखाली वार्याच्या मंद झुळुकेचा आनंद घेत उन्हाच्या प्रखर किरणांपासून स्वतःचा बचाव करताना दिसून येत आहेत.