नाशिक

मांजाच्या विळख्यात अडकलेली घार

सिडकोत संवेदनशीलतेचे दर्शन

सिडको : विशेष प्रतिनिधी
मकरसंक्रांती सणाला तब्बल दहा दिवस उलटूनही आकाशात पतंग उडतच असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे शहरातील विविध भागांत नायलॉन मांजाचे तुकडे अजूनही झाडे, विद्युत तारा आणि इमारतींवर अडकून असल्याचे दिसून येत आहे. या दुर्लक्षाचा फटका आज दत्त चौक परिसरात एका घारीला बसला. उंच भरारी घेत असताना घार मांजाच्या जाळ्यात अडकून गंभीररीत्या जखमी झाली.

दत्त चौक परिसरातील रस्त्यालगतच्या वीजतारांमध्ये घार अडकलेली दिसताच नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. सुटण्याच्या प्रयत्नात घार जोरजोरात फडफड करत असल्याने तिच्या जखमा अधिक गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशा वेळी परिसरातील चिकन सेंटरचे व्यावसायिक मुस्तकीन खाटीक यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून तत्काळ मदतीचा पुढाकार घेतला.
मोठ्या बांबूच्या सहाय्याने अत्यंत संयमाने मांजा काढत त्यांनी घारीची सुटका केली. काही काळ घार थकलेली दिसत होती. मात्र, काही क्षणांतच तिने स्वतःला सावरत पुन्हा आकाशात भरारी घेतली. हा क्षण पाहण्यासाठी परिसरात नागरिकांची गर्दी जमली होती. काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. या घटनेने माणुसकीचे दर्शन घडवले असले, तरी मकरसंक्रांतीनंतरही नायलॉन मांजा न हटवल्यामुळे पक्षी व प्राण्यांचे जीव धोक्यात येत असल्याचे वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अशा घटनांमुळे प्रशासन आणि नागरिकांनी अधिक सजग होण्याची गरज व्यक्त होत आहे.

“घार मांजात अडकलेली पाहून क्षणाचाही विचार न करता मदतीसाठी पुढे आलो. ती सुरक्षित उडून गेली, हे पाहून समाधान मिळालं. नायलॉन मांजा वापरणं थांबवलं पाहिजे.”
– मुस्तकीन खाटीक, व्यावसायिक

नायलॉन मांजा हा पक्ष्यांसाठी अत्यंत घातक आहे. नागरिकांनी स्वतःहून मांजा हटवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि जखमी पक्षी आढळल्यास तात्काळ संबंधित संस्थांशी संपर्क साधावा.
-प्रथमेश चौधरी, पक्षिमित्र

मकरसंक्रांतीनंतरही मांजाचा धोका कायम

मकरसंक्रांतीच्या काळात नायलॉन मांजावर बंदी आणि जनजागृती केली जाते. मात्र, प्रत्यक्षात संक्रांतीनंतरही शहरातील अनेक भागांत तुटलेला मांजा मोठ्या प्रमाणात आढळतो. यामुळे दरवर्षी घार, कबुतर, पोपट तसेच इतर पक्षी आणि प्राणी जखमी होतात. संक्रांतीनंतरही विशेष मोहीम राबवून मांजा हटवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

A nest caught in the web of mange

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

10 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

10 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

10 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

10 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

10 hours ago