नाशिक : वार्ताहर
दाखल गुन्ह्यात अटक न करण्याकरिता तिस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सापळा रचून अटक करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नाशिक ग्रामीण हद्दीत जायखेडा पोलीस ठाणे येथे एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात त्यांना अटक न करण्याकरिता पोलीस शिपाई सचिन राजेंद्र पवार (२९) याने तिस हजार रुपयांची मागणी केली. यावरून तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. यावरून पोलीस अधीक्षक सुनील कडासने,अपर पोलीस अधीक्षक.नारायण न्याहळदे,उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे,हवालदार पंकज पळशीकर,पोलीस नाईक नितीन कराड, प्रभाकर गवळी,वैभव देशमुख,संतोष गांगुर्डे, यांच्या पथकाने पवार यास सापळा रचून तिस हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…