नाशिक

शोभायात्रेने विश्व मराठी संमेलनाच्या सोहळ्याला रंगत

पौराणिक, धार्मिक देखाव्यांसह महापुरुषांच्या वेशभूषेतील कलाकारांनी वेधले लक्ष

नाशिक : प्रतिनिधी
संत गाडगेबाबा, महाबली वीर हनुमान, विठ्ठल-रुक्मिणी, श्री सप्तशृंगी देवी यांसह विविध पौराणिक व धार्मिक देखाव्यांसह महापुरुषांच्या वेशभूषा केलेले कलाकार, तसेच मयूर नृत्य, आदिवासी नृत्य, तारफा वादन, लेझीमपथक यामुळे विश्व मराठी संमेलनानिमित्त शुक्रवारी (दि. 27) काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत रंगत आणली. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, तसेच शहरातील अन्य शाळांतील विद्यार्थीही या शोभायात्रेत सहभागी झाले होते.

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माउली तुकाराम, अशा गजरात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या निवासस्थानापासून मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, परंपरा, मराठी भाषा-अभिजात मराठीचा जागर करीत शुक्रवारी (दि. 27) निघालेल्या या शोभायात्रेने नाशिक शहर दुमदुमून गेले होते.


गोल्फ क्लब, सीबीएस, त्र्यंबक नाका, जुने सीबीएस, जिल्हाधिकारी कार्यालय, मेहेर सिग्नल चौक, अशोक स्तंभ, पोलीस आयुक्त कार्यालयमार्गे या शोभायात्रेचा गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहानजीक समारोप झाला. या शोभायात्रेत महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सहसचिव डॉ. नामदेव भोसले, मविप्र संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, मराठी भाषा विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, बाल रंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के, तसेच विद्यार्थ्यांसह कलाकार, विविध क्षेत्रांतील मान्यवर त्याचप्रमाणे जिल्ह्यातील कवी, साहित्यिक यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले होते.


दरम्यान, शोभायात्रेच्या प्रारंभी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानी मान्यवरांच्या हस्ते हस्ते ग्रंथ आणि पालखीचे पूजन करण्यात आले. मराठी भाषा गौरव दिन अर्थात, कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. चौथ्या विश्व मराठी संमेलनास मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कविवर्य कुसुमाग्रजनगरीत कालपासून प्रारंभ झाला आहे. यात
1 मार्चपर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विश्व मराठी संमेलनानिमित्त सकाळी पालखीसह शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत पारंपरिक लोककला, नृत्यपथक, बोहाडा पथक, लेझीम, ढोल पथकासह वारकर्‍यांची दिंडी सहभागी झाली होती.


भव्यदिव्य अशी विठ्ठलाची मूर्ती, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुकुट, बोहाडा पथकातील विविध रूपे नागरिकांचे आकर्षण ठरले होते. शोभायात्रेच्या सुरुवातीला ढोलपथक, त्यानंतर आदिवासी नृत्यपथक होते. याशिवाय परराज्यांतील नृत्यपथक सहभागी झाले होते. या सर्व गर्दीत विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. विशेषतः पारंपरिक वेशभूषा परिधान करत त्यांनी लेझीमच्या तालावर ठेका धरला. यावेळी विद्यार्थ्यांनी हातात विविध फलक घेऊन माय मराठीचा जागर केला. या शोभायात्रेत विविध शाळा, महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

a-procession-colored-the-celebrations-of-the-world-marathi-conference

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

7 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

7 hours ago