स्वाभिमानाचा एक्झिट केव्हाही बरा!

माजीमंत्री पंकजा मुंडे  यांनी मांडले स्पष्ट मत
नाशिक : गोरख काळे
प्रत्येक किलोमीटरवर हायवेवर एक एक्झिट असतो.  स्वाभिमानाचा एक्झिट केव्हाही बरा. त्यामुळे राजकारणातून बाहेर पडायची मला भीती वाटत नाही. असे सडेतोड उत्तर भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन मिळावे यासाठी नाशिकच्या व्ही प्रोफेशनल्स या संस्थेतर्फे रविवारी (दि.8) आरोग्य विज्ञान विद्यापीठात करिअरबाबत मार्गदर्शनासाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांनी सहभाग घेतला. याच कार्यक्रमात भाजपाच्या पंकजा मुंडे यांची पत्रकार विलास बढे यांनी प्रकट मुलाखत घेतली.
यावेळी  पंकजा मुंडे यांना त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पुढचे दशकभराचे राजकारण कसे बघता? असा प्रश्‍न विचारण्यात आला. त्यावर पंकजा यांनी उत्तर दिले. यावेळी पंकजा मुंढे यांना पक्षाकडून विधान परिषद किंवा इतर ठिकाणी का संधी दिली जात नाही? असा प्रश्‍न विचारला असता, त्यावर पंकजा यांनी उत्तर देणे  टाळले. याचे उत्तर मी नाही देऊ शकत. मला संधी न देणारे याचे उत्तर देऊ शकतील’, असे पंकजा त्यांनी म्हणतं प्रश्‍नाला बगल दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पहिल्यांदा मी आमदार झाल्यानंतर सुधीर गाडगीळ यांनी माझी मुलाखत घेतली होती. तेव्हा मी उत्तर दिलं होतं की, ‘‘ज्या गोष्टी मनात बाळगून मी राजकारणात आलेय. त्या गोष्टी समाजासाठी करण्याची जर मला मुभा नसेल, तर कॉम्प्रोमाइजचं राजकारण करणं मला शक्य नाही’.
पंकजा यांना संकट आल्यावर काय करता? असा प्रश्‍न विचारण्यात आला असता त्यावर त्यांनी उत्तर दिलं. ‘‘मी फार बोलत नाही. खूप लो फील झाल्यावर मी मित्र-मैत्रिणी यांच्याशी बोलते. माझे खूप मित्र आहेत. माधुरी मिसाळ यांना मी माझी मोठी बहीण मानते. त्यांनी खूप खूप मायेचा हात दिलाय. राजकारणात नसते तर मी नक्कीच लेखिका झाले असते.  मला स्वत:ला क्रिएटिव्ह फिल्डमध्ये राहण्यास आवडते. यावेळी पंकजा मुंडे यांनी कॉलेज जीवनातील आठवणींनाही उजाळा दिला. कॉलेजच्या मुलांना बघितले की आपण आता म्हातारे झाल्यासारखे वाटते.  मी कॉलेजमध्ये असताना गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते. त्यामुळे मला कॉलेजमध्ये असताना पण बॉडी गार्ड होता. आजच्या घडीला साहेबांची उणीव जाणवते. त्यांनी आम्हाला सेवा करायची संधीच दिली नाही. साहेबांना रक्त कमी पडले असते तर जगातल्या लोकांनी रक्त दिले असते.  त्यांनी आम्हाला संधी द्यायला पाहिजे, असे मुंडे म्हणाल्या. वडिलांना मी कधीच कोणत्या गोष्टीला नाही बोलले नाही. साहेब होणे खूप कठीण आहे. ताईसाहेब होणे महाकठिण. असेही त्या म्हणाल्या.

काहीतरी मिळावे म्हणून झुकणार नाही
लोकांच्या टाळ्या हाच आमचा ऑक्सिजन आहे. आदरणीय लोकांसमोर झुकायला मला आवडते. परंतु मला काहीतरी मिळावे म्हणून कोणासमोर झुकणे मला पटत नाही. मी संयमी आहे. माझ्यामध्ये आत्मविश्‍वास आहे. परिस्थिती नेहमीच एकसारखी राहत नाही. वाईट दिवस जातात, राजकारणात बरच काही राहून गेलेय.आणि ते मिळविण्याची इच्छा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *