वाघाड फाटा येथे अपघातात जवानाचा मृत्यू तर एक ग्रामस्थ जखमी
दिंडोरी : प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील उमराळे बु गावाजवळील वाघाड फाटा येथे अज्ञात वाहनाने मोटरसायकलला कट मारल्याने जवानाचा जागीच मृत्यू झाला तर एक ग्रामस्थ जखमी झाला. दिंडोरी तालुक्यातील उमराळे गावाजवळील वाघाड फाटा येथे रात्री 9 च्या सुमारास एम.एच. 15. के. ऐ 3204 या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने कट मारल्याने दोघेही रस्त्यावर पडले. या अपघातात पेठ तालुक्यातील उंबरपाडा (क) या गावचे भूमिपुत्र बीएसएफ जवान शशिकांत नाठे याचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा अंत्यविधी उंबरपाडा ता. पेठ येथे आज दिनांक16 रोजी दुपारी दोन वाजता शासकीय इंतमामात होणार आहे. तर गवळीपाडा येथील हिरामण गांगुर्डे हा ग्रामस्थ जखमी झाला असून त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास दिंडोरी पोलीस करीत आहे.