नाशिक : प्रतिनिधी
61 व्या राज्य नाट्य स्पर्धेत काल गुरूवार (दि.8)रोजी फेंट हे चैतन्य सरदेशपांडे लिखीत आणि विक्रम क्षीरसागर दिग्दर्शित फेंट हे नाटक सादर करण्यात आले.फेंट हे नाटक रहस्यमय असुन प्रेक्षकाला खिळून ठेवणारे आहे. तसेच नाटकात दाखवण्यात आलेले रंग हे रंग नसुन समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधीत्व करतात.
वकिली व्यवसाय करत असलेल्या रॉय रंगाच्या शोधात आहे .त्याची लाला नावाची बायको ही एक समाजसेविका आहे. ती त्याला वेळोवेळी वेगवेगळ्या रंगाचे दुष्परिणाम सांगत असते. त्याचवेळी रंगारीचा खून होतो. तो खून हा फक्त खून असतो की त्यामागे घातपात ..हे रस्मयरित्या नाटकात मांडण्यात आले आहे. रंगार्याच्या खुनाच्या संशयाची सुई रॉय लाला की आमदार काळे जाते. या सगळ्यांचा उलगडा म्हणजे फ्रेंड हे नाटक.नाटकाचे पार्श्वसंगीत प्रितीश कामत ,वैभव जैस्वाल, प्रकाशयोजना आदित्य रहाणे ,रंगभूषा साक्षी गोयल, वेशभूषा श्रृती कापसे,नेपथ्य युवराज माळी ,रंगमंच व्यवस्था शुभम चव्हाण ,मनीष गायकवाड यांनी केले.सानिका गायकवाड,अमोल बागुल,विक्रम क्षीरसागर,युवराज माळी ,श्रृती कापसे ,वंदन वेलदे यांनी केले.
आज सादर होणारे नाटक : उदकशांत – कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय,सिडको