मोदक स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सहभाग नोंदविण्यासाठी आज सायंकाळपर्यंत मुदत
नाशिक : प्रतिनिधी
दै.गांवकरी व कै. शिवाजीराव देशमुख सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि श्री. साई बहुद्देशीय संस्था, जळगाव, महाराष्ट्र राज्य व नयना पाटील, मॅनेजिंग पार्टनर एडेलवाईस टोकियो लाइफ इन्शुरन्सगंगापूर रोड यांच्या विशेष सहकार्याने गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या मोदक बनवा अन् चांदीचा मोदक मिळवा या स्पर्धेला महिला वर्गांकडून उत्स्फूतर्र् प्रतिसाद मिळत आहे.
दै.गांवकरीच्यावतीने वाचकांसाठी नेहमीच विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. खास गणेशोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी मोदक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज (दि.6) सायंकाळी 7 पर्यंत स्पर्धेत सहभागासाठी नाव नोंदवता येणार आहे. स्पर्धेतील प्रथम भाग्यवान विजेत्यास चांंदीचा मोदक, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास आकर्षक चांदीची भेटवस्तू बक्षिस देण्यात येणार आहे.
स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ उद्या बुधवार (दि.7) रोजी दै.गांवकरी कार्यालय ,रेडक्र्रॉस सिग्नल येथे दुपारी 3 वाजता आयोजन केले. या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून आमदार सीमा हिरे, जुही पाटील, कै.शिवाजीराव देशमुख सामाजिक संस्था अध्यक्ष चारूशिला देशमुख, साई बहुद्देशिय संस्थेच्या संस्थापिका संगीता पाटील, वैद्य विक्रांत जाधव उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ऍम्रो कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ऍन्ड केटरिंगच्या प्राचार्या सुनंदा सोनी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या स्पधर्र्कांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करत आपला सहभाग निश्‍चित करावा.स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन दै.गांवकरी , कै.शिवाजीराव देशमुख सामजिक संस्थेच्या चारूशिला देशमुख , श्री साई बहुद्देशिय संस्थेच्या संस्थापिका संगीता पाटील आणि मॅनेजिंग पार्टनर एडेलवाईस टोकियो लाइफ इन्शुरन्सच्या नयना पाटील यांनी केले  आहे.

 

Bhagwat Udavant

Recent Posts

कांद्याचे भाव गडगडणार

कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…

4 hours ago

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…

6 hours ago

वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

  वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…

24 hours ago

मृत्यू पश्चातही आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच

मृत्यू नंतरही  आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…

24 hours ago

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे आज अधिवेशन

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…

1 day ago

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

1 day ago