नाशिक: प्रतिनिधी
सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी सप्तशृंग गडावर आज भाविकांची मोठी गर्दी उसळली होती, व्यवस्थापन यांच्या ढिसाळ नियोजनामुळे भाविकांची गैरसोय झाली, चैत्र मासात सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी सर्व भागातून मोठ्याप्रमाणात भाविक गडावर येत असतात, खानदेशची माहेरवाशीण असल्याने खानदेश भागातून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे, उन्हा तान्हाची पर्वा न करता भाविक मोठ्या प्रमाणात येतात. आज भगवान महावीर जयंतीची शासकीय सुट्टी असल्याने गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. गर्दीमुळे लहान मुले, महिला यांचे हाल झाले. या गर्दीचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.