83 कोटींचा खर्च; तपोवनात शंभर खाटांचेे रुग्णालय
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांचा मिळून पंधरा हजार कोटींचा आराखडा शासनाकडे सादर केला आहे. दरम्यान, सिंहस्थात भाविकांच्या आरोग्यासाठी मनपाची हजार वैद्यकीय मनुष्यबळाची टीम तैनात असणार आहे. याकरिता मनपाच्या आरोग्य विभागाने 83 कोटींचा आराखडा तयार केला आहे. पंचवटीसह साधुग्राममध्ये भाविकांची संख्या लक्षात घेऊन तपोवनात शंभर खाटांचे तात्पुरते रुग्णालय उभारले जाणार आहे.
त्र्याऐंशी कोटींतून औषध खरेदीसाठी सहा कोटी व इतर साहित्यासाठी सात कोटी खर्च केले जाणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने प्राधिकरणाची स्थापना केल्यानंतर येत्या काही दिवसांत सिंहस्थ कामांना गती मिळणार आहे. शहरात वर्षभरात दहा कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. आरोग्याच्या द़ृष्टीने कुठलीही अडचण येता कामा नये याकरिता वैद्यकीय विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयासह डॉ. झाकिर हुसैनमध्ये राखीव बेडची व्यवस्था केली जाणार आहे. सिंहस्थ काळात कंत्राटी तत्त्वावर तज्ज्ञांची भरती केली जाईल. एमबीबीएस 63 व 40 विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सिंहस्थात लाखोंची संख्या असल्याने अशावेळी काही आरोग्याचा प्रश्न उदभवल्यास संबंधित व्यक्तीवर उपचार व्हावेत याकरिता महापालिका बाइक अॅम्बुलन्स उपलब्ध करून देणार आहे. पाच बाइक अॅम्बुलन्स तयार करण्यात येणार आहेत. या रुग्णालयात आपत्कालीन सेवा, प्राथमिक उपचार, आयसोलेशन कक्ष, तसेच रुग्णवाहिकांचीही सुविधा असेल. आवश्यकता भासल्यास रुग्णांना जिल्हा रुग्णालयात किंवा खासगी रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था असेल.
सिंहस्थ कुंभमेळ्यात शहरात दाखल होणार्या भाविकांची आरोग्याच्या द़ृष्टीने काळजी घेतली जाणार आहे. यासाठी तपोवनात शंभर खाटांचे रुग्णालय उभारले जाईल. पार्किंगच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय कर्मचार्यांचे पथक उपलब्ध राहणार आहे.
– करिष्मा नायर, अतिरिक्त आयुक्त, मनपा
चांदवड, सुरगाणा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका गटाने वाढ, संख्या 74 वर नाशिक : प्रतिनिधी जिल्हा…
कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या पोषणदूत उपक्रमांतर्गत अंतर्गत…
उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने…
रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत माडसांगवी : वार्ताहर लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ…
लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…
नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…