स्कूटीवरील महिलेची सोन्याच्या दागिन्यांची बॅग चोरट्याने पळवली
लासलगाव : वार्ताहर
लासलगाव येथील आय सी आय सी आय बँकेच्या लासलगाव शाखेतून तारण ठेवलेले १३ तोळे सोने सोडवून बॅगमध्ये घेऊन एक महिला स्कुटीवरून जात असताना लासलगाव कोटमगाव रस्त्यावर पल्सरवर आलेल्या चोरट्याने त्या महिलेच्या हातातील स्कुटी वरील बॅग हिसकावून पलायन केल्याची घटना घडली . या प्रकरणी लासलगाव पोलिसांनी या चोरट्याचा शोध सुरू केला आहे
लासलगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार मोक्षा सुरज भोसले वय-२६ रा.सारोळे ना निफाड जि.नाशिक ह्या त्यांच्या स्कुटीवर दिनांक ४ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेचे सुमारास आय सी आय सी आय बँकेच्या लासलगाव शाखे मधुन तारण ठेवलेले १३ तोळे सोने हे सोडवून स्वतः जवळील बॅगेत ठेवुन पिंपळगाव बसंवत कडे जात असतांना कोटमगाव रोड वरील संस्कार इंग्लिश मिडिअम स्कूल जवळून जात असताना पाठीमागुन एक अनोळखी इसम येवुन त्याने फिर्यादीस आवाज दिला त्यामुळे फिर्यादी यांनी गाडीचा स्पीड कमी केल्याने अनोळखी इसम वय अंदाजे 35 डोक्यात काळ्या रंगाचे हेमलेट घातलेले,अंगात गुलाबी रंगाचा शर्ट व काळी पॅन्ट व काळ्या रंगाची पल्सर पाठीमागे नंबर प्लेट नाही याने फिर्यादीच्या गाडीवर ठेवलेली बॅग चोरून घेवुन कोटमगाव रोडने पिंपळगाव च्या दिशेने जोरात पळून गेला
या घटनेनंतर मोक्षा सुरज भोसले यांनी तातडीने लासलगाव पोलिसांशी संपर्क साधला असता स पो नि भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलिसांनी संशयित व पल्सर गाडीच्या शोध सुरू केला आहे या प्रकरणी रात्री उशिरा लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे