नागपूर : मुलीकडून तिच्या वडिलांनी घेतलेल्या उधारीचे पैसे परत करण्याच्या वादातून जावयाने झोपेत सासर्याच्या डोक्यावर वरवंटा मारून त्यांची हत्या केली. सक्करदरा पोलिसांनी आरोपीला अटक केली. जनार्दन बिसन दमके (वय 65, रा. कळमना, पोस्ट, सिर्सी, ता. उमरेड) असे मृत सासर्याचे तर गौतम केशवराव
फुलझेले (वय 40, रा. बहादुरा जुनी वस्ती) असे आरोपीचे नाव आहे. गौतम पत्नी स्वाती आणि मुलगा व मुलीसोबत बहादुरा येथे वास्तव्यास आहे. पाच वर्षांपूर्वी जनार्दन यांनी मुलगी स्वातीकडून पैसे उधार घेतले होते. 5 मे रोजी जनार्दन आणि त्यांची पत्नी नागपुरात आले. मुलीकडे मुक्कामी होते. दरम्यान, उधारीचे पैसे न दिल्याचा राग गौतम याच्या मनात होता.