नाशिक ः देवयानी सोनार
वाढोलीचा ग्रामसेवक एक लाखाची लाच घेताना जाळ्यात
जग आधुनिकतेकडे वाटचाल करीत असले आणि महिलांनी उंबरठा ओलांडून आपल्या प्रगतीच्या कक्षा कितीही रुंदावल्या असल्या तरी तिचा छळ काही थांबलेला नाही. मुलगी शिकली प्रगती झाली असे बोलले जात असले तरी सासरी आजही छळ होतच असल्याचे आकडेवारीवरून सिद्ध होते. जुनाट मानसिकता ‘साँस भी कभी बहु थी’प्रमाणेच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच पती, सासू, सासरे, नणंद, सासरकडील इतर नातेवाइकांकडून सुनेला त्रास देणे, हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. मानसिक, शारीरिक छळाच्या घटनांचे प्रमाण आजही कायम आहे.
शेतजमीन मोजणीसाठी लाच घेताना भूमिअभिलेखचा कर्मचारी जाळ्यात
वर्षभरात घरगुती हिंसाचाराच्या तब्बल 856 लेखी तक्रारी तर टोल फ्री क्रमांकावर तब्बल 8500 तक्रारी या हिंसाचाराच्या आल्या आहेत.नुकताच आंतरराष्ट्रीय महिलांविरुद्ध हिंसा दिन साजरा झाला. 1091 हा पोलीस हेल्पलाइन क्रमांक फॉर वूमन कार्यरत आहे.परंतु आता 112 हा एकच हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. चालू वर्षात आतापर्यंत नाशिक विभागात जवळपास 34 हजार 522 कॉल्स या क्रमांकावर आले. त्यापैकी महिलांसंदर्भातील 8 हजार 904 तक्रारी होत्या. त्यातही बर्याचशा तक्रारी या घरगुती हिंसाचाराच्या आहेत. या केवळ पोलीस स्टेशनमधील तक्रारी आणि हेल्पलाइवरची आकडेवारी आहे.
प्रकाश आंबेडकरांना अटक करुन दाखवाच वंचितचे महानगर प्रमुख अविनाश शिंदेचे राणे यांना खुले आव्हान
नवरा, सासू-सासरे यांच्याकडून होणार्या छळाच्या तक्रारींबरोबरच शेजार्याशी भांडण, नातेवाइकांशी वाद आदी तक्रारींचे प्रमाण त्यातुलनेत कमी आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती असल्याकारणाने लोकांची मानसिकता, विचार, दृष्टिकोन वेगळा असतो. हल्ली प्रत्येकजण आपले मत, विचार व्यक्त करीत आहे.
स्वतःच्या हक्कांबद्दल जागरूक होत आहे. यातूनच वाद वाढण्याचे प्रकार घडत आहेत. सोशल मीडिया, टीव्ही मालिका आदींचा प्रभावही नकळत होताना दिसून येत आहे. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध करणारा कायदा 2005 मध्ये करण्यात आला. त्यानुसार प्रत्येक स्त्री म्हणू शकते की, तिच्यावर कौटुंबिक हिंसाचार होतो आहे. कारण त्यात मानसिक, शारीरिक, आर्थिक, लैंगिक आणि भावनिक हिंसाचार असे अनेक प्रकार नमूद आहेत.
नाशिक मनपाची अशीही मेहरबानी: विकासकासाठी बारा मिटरचा रस्ता नऊचा केला
कुटुंबात पती-पत्नी हे संसाररूपी रथाची दोन चाके मानली जातात. परंतु पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा, पुरुषी वर्चस्व यातून घरोघरी खटके उडतात. घरातील महिलेवर होणार्या अत्याचाराकडे महिलाही दुर्लक्ष करतात. घरातील कामे, मुलांचे संगोपन, आर्थिक व्यवहार, माहेराहून पैशांची मागणी आदी कारणांहून कुरबुरी वाढत जाऊन हिंसेचे स्वरूप प्राप्त होते.
महिला पर्यटन उद्योजिका साठी एमटीडीसी चे धोरण
पोलीस हेल्पलाइन फॉर वूमन
1091 क्रमांक देण्यात आलेला होता. आता तोही 112 या हेल्पलाइनला जोडला गेला आहे.त्यामुळे महिला हिंसाचाराच्या तक्रारी 1091 किंवा 112 वर देखील करू शकतात.
मनमाडला ऐतिहासिक रेल्वे ओव्हरब्रिज कोसळला
ही आहेत कारणे :
सोशल मीडियाचा वापर मोबाइलचा अमर्याद वापर पती किंवा पत्नीचे अनैतिक संबंध सततचा संशय आर्थिक असमानता मुलांचा सांभाळ प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याची मानसिकता जाणीवपूर्वक आर्थिक छळवणूक सासू-सासर्यांचा सुनेकडून छळ सततचे टोमणे सुनेच्या माहेरच्या मंडळींचा हस्तक्षेप
गोट कोण?ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम्स
वर्षभरात 856 तक्रारी दाखल झाल्या आहेत.तक्रारीप्रमाणे कारवाई सुरू आहे. गुन्हे दाखल झाले आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.टोल फ्री कमांक 112 सर्वांसाठी आहे. त्याचा जास्तीत जास्त वापर करावा. जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करावी. हिंसा, गुन्हा घडल्यास तक्रार कुठे दाखल करावी याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. प्रत्येकाला कायद्याची माहिती असणे गरजेचे आहे.
– प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त (गुन्हे)
शारीरिक, मानसिक, आर्थिक हिंसाचार सिद्ध करता येतो, मात्र भावनिक हिंसाचार सिद्ध करणे कठीण आणि भावनिक हिंसाचाराचे भांडवल केले तर संसार आणि पर्यायाने कुटुंबव्यवस्था टिकणे वा टिकवणे कठीण. मीच का ऐकून घ्यायचे, मीच का तडजोड करायची, या कारणाने हिंसाचाराच्या केसेस दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. हिंसाचार होत असेल तर नक्कीच कायद्याची मदत घ्यावी. मात्र, कायद्याचा दुरुपयोग करून आपला संसार मोडीत निघणार नाही, याचीही खबरदारी घेणे आवश्यक आहे. अलीकडे फक्त एकमेकांची जिरवण्यासाठी, त्रास देण्यासाठीही अशी प्रकरणे दाखल होत असतात.
– अॅड. मीलन खोहर
पाच लाखांची लाच स्वीकारताना सहायक बीडीओ , विस्तार अधिकारीजाळ्यात
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…