महाराष्ट्र

मेळघाटातील आदिवासी तरुणाची ब्रिस्टल विद्यापीठात झेप

परदेश शिष्यवृत्तीने स्वप्न साकार

नाशिक : प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील चिखलदरा तालुक्यातील चिल्हाटी या दुर्गम गावातील किशोर लखाजी बेठेकर या विद्यार्थ्याने ब्रिस्टल विद्यापीठात झेप घेतली आहे.
कोरकू या विशेष दुर्बल आदिम जमातीतील किशोरने ब्रिटनमधील प्रतिष्ठित ब्रिस्टल विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळवून आपल्या गावासह संपूर्ण समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे. आदिवासी विकास विभागाच्या परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेमुळे प्रवेश घेणे शक्य झाले आहे.
आदिम जमातीतून परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणारा दुर्गम आणि मर्यादित शैक्षणिक सोयीसुविधा असलेल्या भागातून किशोेर आपल्या गावातील आणि परिसरातील पहिलाच विद्यार्थी ठरला आहे.
घरचे दैनंदिन व्यवहार कोरकू भाषेत होत असताना, शालेय शिक्षण पूर्णपणे मराठी माध्यमात झाल्यामुळे सुरुवातीला भाषेचे मोठे आव्हान त्याच्यासमोर होते, मात्र जिद्द आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्याने हे आव्हान यशस्वी पेलले.
किशोरचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत तर पुढील शिक्षण मेळघाटातील आश्रमशाळेत पूर्ण झाले. सन 2020-22 या कालावधीमध्ये त्याने मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमधून सामाजिक कार्य विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. आता त्याला ब्रिटनच्या ब्रिस्टल विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळाला आहे. परदेश शिक्षण शिष्यवृत्तीमुळे त्याच्या उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाला असून, शिक्षण शुल्कासह विमान प्रवासाचा खर्च, निवास खर्च आणि इतर शैक्षणिक खर्च शासन
उचलणार आहे.

44,578 जीबीपी शिष्यवृत्ती मंजूर

आदिवासी विकास आयुक्तालयाने किशोर बेठेकर याला उच्च शिक्षणासाठी 44,578 जीबीपी इतकी शिष्यवृत्ती मंजूर केली आहे. यामध्ये 28,200 जीबीपी शैक्षणिक शुल्क, 15,278 जीबीपी निर्वाह भत्ता आणि 1,100 जीबीपी स्टेशनरी व इतर खर्चाचा समावेश आहे. आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांच्या स्वाक्षरीने मंजुरीचे पत्र निर्गमित करण्यात आले आहे.

आदिवासी विकास विभागाच्या परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून दुर्गम भागातील विद्यार्थी आता सातासमुद्रापार जाऊन आपले भविष्य उज्ज्वल करत आहेत. त्यांच्या जागतिक शैक्षणिक प्रवासाला मोठी चालना मिळत आहे. किशोर बेठेकरचे यश हे आदिम जमाती समुदायातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आगामी शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा.
– लीना बनसोड, आयुक्त, आदिवासी विकास विभाग

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

2 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

2 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

2 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

2 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

2 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

2 hours ago