खा. गोडसेंचे रेल्वे प्रशासनाला निवेदन
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक – जिल्ह्यातील प्रशासनाच्या रेल्वे विषयी अनेक समस्या आहेत.पंचवटी एक्सप्रेस रोज जाताना आणि येताना वेळेवर पोहचावी,नाशिक -मुंबई दरम्यानचा प्रवास सव्वादोन ते अडीच तासात व्हावा, मुंबईहून कसारा मार्गे देशभरात धावणाऱ्या शंभर एक्सप्रेसचा प्रवास गतीमान होण्यासाठी घाट परिसरात जमिन पातळीवर बोगदा उभारण्यात यावा. अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी मुंबई मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांच्याकडे केली.
गोडसे यांनी निवेदनात म्हटले कीं, अनेक समस्या रेल्वे प्रवाशांना सतत भेडसावत असतात. प्रवाशांचा प्रवास कमीत कमी वेळेत आणि विनाआयास व्हावा यासाठी रेल्वे विषयीच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात अशा आग्रही मागण्यांचे त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिले आहेत.
रेल्वे प्रशासनाच्या तांत्रिक अडचणीमुळे मनमाड मुंबई,नाशिक मुंबई या दरम्यानच्या प्रवासासाठी रेल्वेगाडयांना अधिकचा वेग लागत असतो.सर्वच रेल्वेगाडया उशिराने धावत आणि पोहचत असल्याने प्रवाशांची मोठी कुंचबना होत असते.चाकरनाम्यांसाठी असलेली पंचवटी एक्सप्रेस तर रोजच उशिराने धावत असल्याने कामगारांचे सव्हिस रिपोर्ट खराब होतात.कसारा – इगतपुरी या दरम्यानच्या घाट परिसरात जमिन पातळीवर बोगदा नसल्याने मुंबईहून कसारा मार्गे देशभर धावणाऱ्या रेल्वेगाड्या इच्छीत ठिकाणी उशिराने पोहचतात. या समस्यांतून प्रवाशांना दिलासा मिळण्यासाठी रेल्वे प्रवाशी संघटनांनी खा.गोडसे यांच्या अनेकदा तक्रारी केल्या आहेत. प्रवाशांच्या मागणी न्यायिक व योग्य असल्याने आज मुंबईत आयोजित केलेल्या संसद सदस्य समितीच्या बैठकीनंतर खा.गोडसे यांनी मुंबई रेल्वेचे महा०यवस्थापक नरेश ललवाणी यांची भेट घेतली.यावेळी गोडसे यांनी रेल्वे प्रशासनाकडे अनेक समस्यांचे विशेष निवेदन दिले.यामंध्ये कसारा – इगतपुरी यादरम्यानच्या घाट परिसरात जमीन पातळीवर बोगदयाची उभारणी करण्यात यावी,नाशिक जिल्ह्यातील चौदा क्रॉसिंगच्या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल उभारण्यात यावेत. राजधानी, गोदावरी,देवगिरी, जनशताब्दी,पंजाब मेल,अमृतसर या गाड्यांना देवळाली कॅम्प स्टेशन येथे थांबा देण्यात यावा.पंचवटी एक्सप्रेसमध्ये महिलांसाठी स्वतंत्र बोगी असावी,चाकणनामांसाठी असलेली पंचवटी एक्सप्रेस जाताना आणि येताना वेळेवरती पोहचवी,पंचवटी एक्सप्रेसचा प्रवास वेगाने होण्यासाठी पंचवटीला दुहेरी इंजन बसवावे,नासिक येथून कल्याणमार्गे अजमेरला जाण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस ट्रेन उपलब्ध करून द्यावी,इगतपुरी -भुसावळ मेमूला लहवित रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा, नाशिक – पुणे लोहमार्गासाठी प्रशासनाकडून प्रयत्न व्हावेत, लेव्हल क्रॉसिंग ८४ A बारा तासांऐवजी चोवीस तासांचा करावा,नाशिकरोडच्या मालधक्क्यावर थांबत असलेल्या मालवाहू गाड्या शहराबाहेर नेण्यात याव्यात,नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे या मागण्यांचा समावेश आहे.
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…