मतदान झाले; आकडेमोड करण्यात कार्यकर्ते गुंतले!

मतदान झाले; आकडेमोड करण्यात कार्यकर्ते गुंतले!
नाशिक : प्रतिनिधी
अठराव्या लोकसभेसाठी सोमवारी नाशिक, दिंडोरी, धुळे मतदार संघात मतदानाची प्रक्रिया पार पडली. गेले दीड महिना कार्यकर्ते, उमेदवार यांची मोठी धावपळ सुरू होती. मतदान पार पडले असले तरी प्रत्यक्ष निकाल हाती येण्यास पंधरा दिवस अवकाश आहे. मतदान झाल्यानंतर आता उमेदवार आणि कार्यकर्ते कागदावर गणिते मांडत असून, कोणत्या भागात कोणता उमेदवार जास्त चालला याची माहिती घेत विजयाचे आडाखे बांधत असल्याचे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाले असले तरी निकालासाठी 4 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र मतदानाची आकडेवारी  आल्यानंतर आकडेवारीचा अभ्यास करत , प्रचारातील मुद्यावर चर्चा करत कोण निवडून  येऊ शकते, याचा अंदाज बांधण्यात येत आहे.
यंदा नाशिक  मतदार संघात मतदानाचा टक्का वाढला आहे. यंदा नाशिकमध्ये 60.75  तर दिंडोरी मतदार संघात 66.75  टक्के मतदान झाले. दिंडोरी मतदार संघात मागील वेळेपेक्षा मताचा टक्का वाढला मात्र मतदानाचा टक्का घसरला आहे.   मात्र मतदानाचा ं टक्का वाढल्याने आता रिंगणात असलेल्या उमेदवारासह कार्यकर्त्यांना निकाल काय असेल याची उत्सुकता असुन प्रत्येक पक्षांकडून आपणच निवडून येणार असल्याचा दावा केला जात आहे. कार्यकर्ते आणि उमेदवारांकडून विधानसभानिहाय मतदार संघात झालेल्या मतदानाचा आढावा घेत कोणाला किती मतदान झाले असेल आणि कोण निवडून येणार याचे गणित मांडत आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर सायंकाळी एक्झीट पोल येतील. तोपर्यंत राजकीय कार्यकर्ते, नेते, उमेदवार, विश्लेषक यांच्यासह राजकारणाची आवड असणार्या प्रत्येकांकडून नाशिक आणि दिंडोरीत कोण आणि का ? निवडून येणार याच्या चर्चा रंगणार आहे.

चौका चौकात रंगतायेत चर्चा
शहरातील चौकाचौकात, चहा टपरीवर , कार्यालयात  राजकारणाविषयी चर्चा रंगत असून कोण निवडून येणार याचे आडाखे बांधण्यात येत आहे.

आप्पा की भाऊ? सर की ताई ?
नाशिक मतदार संघात महायुतीचे हेमंत अप्पा गोडसे तिसर्‍यांदा निवडून येत विजयाची हॅट्ट्रिक करणार की महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे  गोडसेंचा धोबीपछाड देत नाशिकचा गड सर करणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. दिंडोरी महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार निवडून येत तुतारी वाजू देणार नाही की महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. भास्कर भगरे कांदाप्रश्नामुळे ताईंचा वांधा करत दिंडोरीचा गड मिळवणार? याची आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *