आजारपणाला कंटाळून एका महिलेची आत्महत्या

आजारपणाला कंटाळून एका महिलेची आत्महत्या

 

सातपूर: प्रतिनिधी

सारूळ विल्होळी येथे रहाणाऱ्या एका महिलेचा मृत्यूदेह गंगापूर धरण येथे मिळून आला आहे. अश्विनी पप्पू फडोळ वय 23 असे या महिलेचे नाव असून तिने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. अश्विनी पप्पू फडोळ या सारूळ विल्होळी येथे रहात होत्या मृत महिला  दिनांक 10 फेब्रुवारी रोजी मिसिंग झाल्याशी तक्रार अंबड पोलीस ठाणे येथे दाखल होती.  आज सकाळच्या सुमारास डॅम परिसरात असलेले सिक्युरिटी गार्ड यांनाही मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. अनेक दिवसापासून अश्विनी फडोळ या  आजारी होत्या. त्यांना स्पर्श हॉस्पिटल येथे ऍडमिट देखील केलेलं होतं मात्र वारंवार तोच आजार तो त्रास सहन करून त्या कंटाळल्या होत्या असे नातेवाईक मत व्यक्त केले संबंधित पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *