आजारपणाला कंटाळून एका महिलेची आत्महत्या
सातपूर: प्रतिनिधी
सारूळ विल्होळी येथे रहाणाऱ्या एका महिलेचा मृत्यूदेह गंगापूर धरण येथे मिळून आला आहे. अश्विनी पप्पू फडोळ वय 23 असे या महिलेचे नाव असून तिने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. अश्विनी पप्पू फडोळ या सारूळ विल्होळी येथे रहात होत्या मृत महिला दिनांक 10 फेब्रुवारी रोजी मिसिंग झाल्याशी तक्रार अंबड पोलीस ठाणे येथे दाखल होती. आज सकाळच्या सुमारास डॅम परिसरात असलेले सिक्युरिटी गार्ड यांनाही मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. अनेक दिवसापासून अश्विनी फडोळ या आजारी होत्या. त्यांना स्पर्श हॉस्पिटल येथे ऍडमिट देखील केलेलं होतं मात्र वारंवार तोच आजार तो त्रास सहन करून त्या कंटाळल्या होत्या असे नातेवाईक मत व्यक्त केले संबंधित पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…