आयशर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

चांदवड-लासलगाव रोडवरील अपघात

चांदवड : वार्ताहर
चांदवड-लासलगाव रोडवर रविवारी (दि. 10) झालेल्या भीषण अपघातात तरुण दुचाकीस्वार जागीच ठार झाला. भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात सायंकाळी घडला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. दिगंबर राजू पाथरे (वय 21, रा. गजानन कॉलनी, चांदवड) हा तरुण दुचाकीवरून जात असताना भरधाव आयशर ट्रकने त्याला धडक दिली. धडकेनंतर ट्रकचे चाक दिगंबरच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात आणखी एका दुचाकीलाही धडक बसल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक कैलास वाघ, हवालदार स्वप्नील जाधव, रोहिदास पाचपुते आणि विक्रम बस्ते यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल केले. मृत दिगंबर चांदवड येथील गजानन कॉलनीतील रहिवासी आहे आणि तो चोलामंडलम कंपनीसाठी कलेक्शनचे काम करत होता. तो आई-वडिलांचा एकुलता होता. त्याच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या पश्चात आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे. हवालदार स्वप्नील जाधव तपास करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *