मालेगांव : प्रतिनिधी
मालेगाव शहरातील गांधीनगर भागात मोबाईल च्या वादातून तरुणाचा धारदार सुऱ्याने भोसकून खुन करण्यात आला आहे या खुन प्रकरणी आरोपीला आझादनगर पोलिसांनी अटक केली आहे. सलमान शेख उर्फ सुलेमान शेख शकील (२५), रा. नुमानी नगर, मालेगांव असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी संशयित आरोपी आरिफ खान आसिफ खान (वय २९, रा. गांधीनगर, ग.नं. ३, मंजील मेडिकल जवळ, मालेगांव) याला अटक केली आहे. नुमानी नगर भागात रहाणाऱ्या सुलेमान शेख याने आरिफ खानला मोबाईल दिला होता. रात्री दीड वाजता तो मोबाईल परत घेण्यासाठी आरिफकडे गेला होता. या वेळी दोघांमध्ये वाद झाला. वादात आरिफ याने धारदार सुऱ्याने सुलेमान याच्या डाव्या हाताच्या मागील बाजूस भोसकले. खोलवर घाव झाल्याने सुलेमान रक्ताच्या थारोळ्यात पडुन त्याचा मृत्यू झाला. या खुन प्रकरणी मयत सुलेमान शेख याचा मामा शेख लुकमान शेख उस्मान (रा. प्लॉट नं. ६८, सिद्दीकी अकबर मशिद रौशनाबाद, मालेगांव) यांच्या फिर्यादीवरून आरोपी आरिफ खान आसिफ खान याला आझादनगर पोलिसांनी अटक केली. अधिक तपास पोउनि. हंडाळ करीत आहेत.